Robert Vadra ED Summons
नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वधेरा यांना नवे समन्स बजावले. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) चौकशीसाठी त्यांना १७ जूनरोजी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत.
संजय भंडारी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी ईडीने समन्स बजावल्याचे सूत्रांनी सांगितले. रॉबर्ट वधेरांना १० जून रोजी या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, तापेची लक्षणे असल्याचे सांगत ते चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी प्रोटोकॉलनुसार कोविड चाचणी केली आहे, असे सांगून ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ईडीने नवे समन्स बजावले असल्याचे सूत्रांनी सांगितले.