इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक पदाच्या ४४,२२८ रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. File photo
राष्ट्रीय

India Post GDS Recruitment 2024 | पोस्टात ४४,२२८ जागांसाठी भरती, 'असा' करा ऑनलाईन अर्ज

१० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील सर्वात मोठी टपाल नेटवर्क सेवा असलेल्या इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदाच्या ४४,२२८ रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी https://indiapostgdsonline.gov.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करण्यास १५ जुलैपासून सुरुवात झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्ट आहे.

सध्या नोकरीत असलेल्यांना आर्थिक वर्ष २०२५ साठी शाखा पोस्टमास्टर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/ डाक सेवक म्हणून नियुक्त केले जाईल. या पदांसाठी पगार खालीलप्रमाणे आहे : ABPM/GDS साठी प्रति महिना १०,०००-२४,४७० रुपये प्रति महिना आणि BPM साठी प्रति महिना १२,०००-२९,३८० रुपये.

पात्रता काय?

संपूर्ण देशात एकूण ४४,२२८ रिक्त जागांसाठी भरती अधिसूचित करण्यात आली आहे. यासाठी इयत्ता १० पासचे प्रमाणपत्र असलेले १८-४० वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छूक उमेदवारांना त्यांचे कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त शाळा मंडळाकडून गणित आणि इंग्रजीमध्ये गुण दर्शवणारे माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

अर्ज करण्यासाठी नोंदणी, अर्ज शुल्क आणि ऑनलाइन अर्ज अशी तीन टप्प्यांत प्रक्रिया आहे.

असा करा अर्ज?

  • इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि येथे नोंदणी करा - www.indiapostgdsonline.gov.in.

  • नोंदणी करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्डसह नोंदणी करण्यासाठी ईमेल आयडी आवश्यक आहे.

  • त्यानंतर ऑनलाइन नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अर्जाचे शुल्क भरावे लागेल.

  • तुम्ही अर्ज शुल्क भरल्यानंतर तुम्ही Division आणि Exercise पर्यायांमधून निवड करून ऑनलाइन अर्ज करू शकता.

  • दिलेले स्वरूप आणि आकारानुसार अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.

  • तुम्ही अर्ज करत असलेल्या विभागाचा विभागीय हेडदेखील निवडणे आवश्यक आहे, जो भरती प्रक्रियेनंतरच्या टप्प्यात तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT