AI मुळे नोकऱ्या जातायत का? सॅम ऑल्टमन स्पष्टच बोलले; काही कंपन्या आधीच तयार होत्या! file photo
राष्ट्रीय

AI मुळे नोकऱ्या जातायत का? सॅम ऑल्टमन स्पष्टच बोलले; काही कंपन्या आधीच तयार होत्या!

AI च्या नावाखाली नोकरकपात? सॅम ऑल्टमन यांच्या वक्तव्याने जागतिक स्तरावर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

real impact of ai doing jobs would be palpable in the next few years but some companies sam altman new statement

पुढारी ऑनलाईन :

OpenAI चे CEO Sam Altman यांनी सांगितले आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा नोकऱ्यांवर होणारा खरा परिणाम पुढील काही वर्षांत स्पष्टपणे दिसून येईल. मात्र सध्या काही कंपन्या AI च्या नावाखाली नोकऱ्यांमध्ये कपात करत आहेत, जे प्रत्यक्षात त्यांनी आधीच नियोजन करून ठेवले होते.

AI मुळेच नोकऱ्या जात आहेत, असे म्हणणे योग्य नाही

AI मुळे नोकऱ्यांमध्ये कपात होत असल्याबाबत बोलताना OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन म्हणाले की, काही कंपन्या ज्या नोकऱ्या आधीच कमी करण्याच्या तयारीत होत्या, त्यासाठी आता AI ला कारणीभूत ठरवत आहेत. AI नसते तरीही त्या नोकऱ्या गेल्याच असत्या, असे त्यांचे मत आहे. किती कंपन्या AI वर जबाबदारी टाकत आहेत, याचा नेमका अंदाज आपल्याकडे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कंपन्यांची आधीपासूनच तयारी होती

एका वृत्त संस्थेशी संवाद साधताना सॅम ऑल्टमन म्हणाले की, AI मुळे जॉब मार्केटमध्ये हालचाल जरूर सुरू झाली आहे, पण त्याचा मोठा परिणाम सध्या दिसत नाही. काही ठिकाणी कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यामागे AI आणि तंत्रज्ञानाचे कारण देत आहेत, मात्र हे निर्णय त्यांनी खूप आधीच घेतले होते. त्यांच्या मते, AI मुळे नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे आणि पुढील काही वर्षांत हे बदल अधिक ठळकपणे जाणवतील. AI च्या युगात नव्या प्रकारच्या नोकऱ्या तयार होतील, असेही त्यांनी सांगितले.

AI च्या नावाखाली मोठ्या कंपन्यांमध्ये कपात

अलीकडे अनेक मोठ्या कंपन्यांनी AI च्या कारणास्तव कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. यामध्ये Amazon सारख्या दिग्गज कंपनीचाही समावेश आहे. मात्र कोणत्याही कंपनीने AI मुळे त्यांच्या व्यवसायावर नेमका किती परिणाम झाला आहे किंवा त्याचा फटका किती मोठा आहे, याची ठोस माहिती दिलेली नाही. तरीही AI चा दाखला देत कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात आहे. सॅम ऑल्टमन यांनी यापूर्वीही सांगितले होते की, AI मुळे नोकऱ्यांमध्ये अडथळे येतील, पण लोक नव्या पद्धतीने काम करायला शिकतील आणि AI सोबत स्वतःला जुळवून घेतील.

तज्ज्ञांचे आधीच इशारे

AI मुळे भविष्यात नोकऱ्यांमध्ये कपात होईल, असा इशारा अनेक तज्ज्ञ आणि मोठ्या कंपन्यांचे CEO यापूर्वीच देत आले आहेत. मागील वर्षापासूनच छाटणीचे सत्र सुरू आहे. त्यामुळेच सॅम ऑल्टमन यांनीही या विषयावर आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान, OpenAI चे CEO इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्यासोबत मंचावर हात उंचावला होता. मात्र त्यांनी AI कंपनी Anthropic चे CEO यांचा हात न धरल्यामुळे हा प्रसंग चर्चेत आला होता. यावर स्पष्टीकरण देताना सॅम ऑल्टमन म्हणाले की, मंचावर नेमके काय होणार आहे, याची त्यांना कल्पना नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT