राष्ट्रीय जनता दलाचे सर्वोसर्वा लालू प्रसाद यादव यांनी आपले पुत्र तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav ) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांनी एक्स पोस्ट करत या कारवाईची माहिती दिली आहे.
लालू प्रसाद यादव यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'खाजगी जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाचे व्यवहार, सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदार वर्तन हे आपल्या कौटुंबिक मूल्ये आणि परंपरांनुसार नाही. म्हणून, वरील परिस्थितीमुळे, मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवतो. आतापासून त्यांना पक्षात आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही. त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे.
'तो स्वतः त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील चांगले-वाईट आणि गुण-दोष पाहण्यास सक्षम आहे. ज्यांच्याशी त्याच्याशी संबंध आहेत त्यांनी स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत. कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात ही कल्पना स्वीकारली आहे आणि तिचे पालन केले आहे, असेही लालू प्रसाद यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
या घडामोडींबद्दल बाेलताना लालू प्रसाद यादव यांचे धाकटे पुत्र आणि तेजप्रताप यांचे धाकटे बंधू तेजस्वी यादव म्हणाले की, व्यक्तीने त्यांचे राजकीय आणि वैयक्तिक जीवन वेगळे ठेवले पाहिजे. माझ्या मते, मला हे सर्व आवडत नाही आणि सहनही होत नाही. वैयक्तिक जीवन वेगळे असले पाहिजे. ते मोठे आहेत आणि त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु लालूजींनीही ट्विटद्वारे त्यांचे विचार स्पष्ट केले आहेत. त्यांनी जे योग्य वाटले ते केले. मला तेजप्रताप यांच्यावर केलेली कारवाई माध्यमांद्वारेच कळली."
दरम्यान तेजप्रताप यादव याने शनिवारी फेसबुकवर एका मुलीबरोबर फोटो शेअर केला होता. त्यामध्ये आम्ही १२ वर्षांपासून रिलेशनमध्ये आहे असे म्हटले होते. ते अनेक दिवसांपासून ही गोष्ट जाहीर करणार होते ते करु शकले नाही अशी माहीती समोर येत आहे. आपले अंकाऊंट हॅक झाले आहे व माझे एआय जनरेटेड फोटो व्हायरल करुन बदनाम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.