Rajkot Gujarat Earthquake: गुजरातमधील राजकोटमध्ये गेल्या १२ तासात वेगवेगळ्या अंतराने तब्बल ९ भूकंपाचे झटके बसले. यामुळे लोकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली. या भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर २.७ ते ३.८ च्या दरम्यान होती. मिळालेल्या माहितीनुसार रात्री ८ वाजल्यापासून सकाळी ८ वाजेपर्यंत हे भूकंपाचे धक्के जाणवत होते. त्यामुळे राजकोटमधील लोकांची संपूर्ण रात्र थरथराटात अन् भीतीच्या सवटाखाली गेली आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही वित्त किंवा जिवीज हानी झाल्याचे वृत्त नाहीये.
भारताचा ५९ टक्के भाग हा भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. भारतात नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ मध्ये जवळपास १५९ भूकंप आले आहेत. Bureau of Indian Standards (BIS) ने दिलेल्या माहितीनुसार भारताची भूकंपाच्या दृष्टीकोणातून ४ झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. याला सेसमिक झोन (Seismic Zone) देखील म्हणतात.
भारतात अनेकवेळा भूकंप आले आहेत. मात्र त्यातील दोन भूकंप सर्वाध भीषण मानले गेले आहेत. त्यात अने लोकांचा मृत्यू झाला असून आर्थिकही मोठं नुकसान झालं होतं.
भारतातील अनेक सरकारांना देशात कधीही अधिक तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो याची कल्पना आहे. त्यामुळे त्यासाठी उपाययोजना देखील करण्यात आली आहे. २०१४ पर्यंत फक्त ८० सेसमिक निरीक्षण केंद्रे होती. आता ती २०२५ पर्यंत वाढवून १६८ करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण देशात Earthquake Early Warning System सुरू करण्यासाची तयार सुरू आहे. उत्तराखंड राज्यात २०२१ मध्ये Earthquake Early Warning System सुरू करण्यात आली आहे. याचे जे काही निष्कर्ष आहेत ते Bhukamp Disaster Early Vigilante अॅपवर शेअर केला जातो.
तंत्रज्ञानाचा वापर करून भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे लोकांमध्ये जागृती देखील निर्माण केली जात आहे. त्यामुळे NDMA ने मार्च महिन्यातच आपदा का सामना असे एक जागृकता अभियान सुरू केलं होतं. या मोहीमेअंतर्गत दूरदर्शनवर काही प्रोग्राम प्रसारित करण्यात आले. मोदींनी देखील याची गंभीरता लक्षात घेऊन २०१६ मध्ये १० मुद्द्यांचा अजेंडा तयार केला होता. यात अर्ली वॉर्निंग सिस्टम सुरू करणे आणि वीमा पॉलिसी या दोन प्रमुख मुद्यांचा समावेश होता.