पुढारी वृत्तसेवा
त्सुनामी, भूकंप, ज्वालामुखी अशा प्रकारच्या कोणत्याही विनाशकारी घटना पृथ्वीवर होण्याआधी प्राणी देतात संकेत.
नैसर्गिक संकट येण्याआधी प्राण्यांच्या हालचालीत होतो बदल.
निसर्गात असे काही प्राणी, पक्षी आहेत त्यांना नैसर्गिक आपत्तीची आधीच माहिती होते अन् ते सावध होतात.
भारत, जपान, चीन, इंडोनेशिया अशा देशांमध्ये भूकंप, येण्याआधी पक्षी उडून जाणे, बिळातून साप बाहेर पडणे, कुत्र्याचे भुंकणे नोंदवले गेले आहे.
तर पुराच्या आधीच जंगलातले प्राणी उंच ठिकाणी गेल्याचे निरिक्षण नोंदेवण्यात आले आहे.
पूर येण्यापूर्वीच मुंग्याही वारूळातून स्थलांतर करत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राण्यांची इंद्रिये मानवापेक्षा संवेदनशिल असतात. भूगर्भातील भूकंपीय लहरी त्यांना मानवाआधी समजतात.
इतकेच काय निसर्गातील छोटे बदलही प्राणी अचूक हेरतात. यावेळी त्यांच्या हालचालीत बदल होतात.