राजा रवी वर्मा यांच्‍या कारकिर्दीतील सर्वोत्‍कृष्‍ट चित्रांपैकी एक अशी 'यशोदा आणि कृष्ण' चित्राची ओळख आहे.  Pudhari Photo.
राष्ट्रीय

HISTORIC AUCTION RECORD | राजा रवी वर्मांच्या 'यशोदा आणि कृष्ण' चित्राने मोडले सर्व रेकॉर्ड्स; किंमत वाचून व्हाल थक्क!

HISTORIC AUCTION RECORD |सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक उद्योगपती सायरस पूनावाला यांनी केले खरेदी

पुढारी वृत्तसेवा

राजा रवी वर्मा यांच्‍या कारकिर्दीतील सर्वोत्‍कृष्‍ट चित्रांपैकी एक अशी 'यशोदा आणि कृष्ण' चित्राची ओळख आहे. १८९० च्या दशकातील मातृप्रेमाची झलक दाखविणारे हे चित्र पाहणाऱ्याला पवित्र कथेचा अनुभव देते.

HISTORIC AUCTION RECORD

नवी दिल्‍ली : भारतीय चित्रकलेच्या इतिहासात एका नव्या पर्वाची नोंद झाली आहे. जगप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या कुंचल्यातून साकारलेली अजरामर कलाकृती 'यशोदा आणि कृष्ण' या कलाकृतीने लिलावाच्या सर्व मर्यादा ओलांडत जागतिक स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

'यशोदा आणि कृष्ण' तैलचित्राची १६७.२ कोटी रुपयांना विक्री

राजा रवी वर्मा यांच्या 'यशोदा आणि कृष्ण' तैलचित्र चित्र १६७.२ कोटी रुपयांना (सुमारे १८ दशलक्ष डॉलर्स) विकले गेले.बुधवारी मुंबईत झालेल्या 'सफ्रॉनआर्ट'च्या स्प्रिंग लाइव्ह लिलावात या चित्रासाठी बोलीने नवा उच्‍चांक गाठला. अखरे हे चित्र सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आणि उद्योगपती अब्जाधीश सायरस पूनावाला यांनी खरेदी केले.

एम. एफ, हुसेन यांचा विक्रम मोडीत

राजा रवी वर्मा यांच्या 'यशोदा आणि कृष्ण' तैलचित्रावर तब्‍बल १६७.२ कोटी रुपयांची बोली लागली. ही किंमत एम.एफ. हुसेन यांच्या 'अनटाईल्ड' या चित्राच्या मागील विक्रमापेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षी हे चित्र दिल्लीतील संग्राहक किरण नादर यांनी ११.८ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकत घेतले होते. 'पीटीआय'च्‍या वृत्तसंस्थेनुसार, राजा रवी वर्मा यांच्या या चित्राची किंमत ८० ते १२० कोटी रुपयांदरम्यान असेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता; परंतु त्यापेक्षा दुप्पट किमतीत हे चित्र विकले गेले.

चित्र खरेदी करणे माझ्‍यासाठी सन्‍मानाची गोष्‍ट : सायरस पूनावाला

'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना पूनावाला म्हणाले की, ही खरेदी करणे माझ्यासाठी सन्मानाची आणि कर्तव्याची गोष्ट आहे. राजा रवी वर्मा यांचे चित्र हे राष्ट्रीय ठेवा आहे. ते लोकांसाठी प्रदर्शनात ठेवला जावा आणि यासाठी मी प्रयत्न करेन."

'यशोदा आणि कृष्ण' चित्राचे महत्त्व

राजा रवी वर्मा यांच्‍या कारकिर्दीतील सर्वोत्‍कृष्‍ट चित्रांपैकी एक अशी 'यशोदा आणि कृष्ण' चित्राची ओळख आहे. १८९० च्या दशकातील या तैलचित्रात यशोदा गाईचे दूध काढत असताना दिसत आहे, तर बाळ कृष्ण दुधाच्या पेल्यासाठी मागून हात पुढे करत आहे. मातृप्रेमाची झलक दाखविणारे हे चित्र पाहणाऱ्याला पवित्र कथेचा अनुभव देते. लिलावापूर्वी माध्‍यमांशी बोलताना 'सफ्रॉनआर्ट'चे सीईओ आणि सह-संस्थापक दिनेश वजरानी यांनी सांगितले की, राजा रवी वर्मा यांची 'यशोदा आणि कृष्ण' ही कलाकृती एक भावपूर्ण आणि ध्यानमग्न रचना आहे. ही असाधारण कलाकृती 'यशोदा आणि कृष्ण' पहिल्यांदाच लिलावात समाविष्ट करणे, हे आमच्यासाठी भाग्याचे आहे."

राजा रवी वर्मा भारतीय आधुनिक कलेचे प्रणेते

भारतीय आधुनिक कलेचे प्रणेते राजा रवी वर्मा यांचा १८४८ मध्‍ये त्रावणकोरच्या किलिमानूर कुटुंबात जन्म झाला होता.त्‍यांनी भारतात तैलचित्र कलेला लोकप्रिय केले. युरोपियन वास्तववाद आणि भारतीय पौराणिक विषय यांची सांगड घालणारे ते देशातील पहिले चित्रकार होते. १८९४ मध्ये, त्यांनी आपल्या चित्रांच्या स्वस्त प्रती मोठ्या प्रमाणात छापण्यासाठी एक लिथोग्राफिक प्रेस देखील सुरू केली, ज्याद्वारे हिंदू देवदेवतांची चित्रे देशातील कानाकोपऱ्यातील घराघरांत पोहोचली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT