राष्ट्रीय

रेल्वेच्या खासगीकरणाचा राहुल गांधी यांचा दावा चुकीचा; पीआयबीची माहिती

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेला रेल्वेच्या खासगीकरणाचा दावा चुकीचा असल्याचे केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाच्या अखत्यारितील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडून (पीआयबी) रविवारी सांगण्यात आले. केंद्र सरकारकडून रेल्वेचे खासगीकरण सुरु असल्याचा दावा राहुल गांधी यांनी नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता.

रेल्वे ही देशाला जोडते. दररोज अडीच कोटी लोक रेल्वेतून प्रवास करतात. आणि 12 लाख लोकांना थेट रोजगार याच्या माध्यमातून मिळालेला आहे. पंतप्रधान मोदीजी, रेल्वे ही देशाची संपत्ती आहे, कृपाकरून तिचे खाजगीकरण करू नका. तिला मजबूत करा, ती विकू नका', असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. विशेष म्हणजे भारत जोडो मोहिमेत सामील असलेल्या राहुल गांधी यांना तेलंगणमध्ये रेल्वे कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना भेटून रेल्वेचे खासगीकरण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.

रेल्वेचे खासगीकरण सुरु असून मोठ्या खासगी कंपन्या रेल्वेची संपत्ती व सेवा खरेदी करीत असल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चेदरम्यान केला होता. 151 रेल्वेगाड्यांचे खासगीकरण झाल्याचेही या संघटनांकडून गांधी यांना सांगण्यात आले होते. हा संदर्भ देत गांधी यांनी ट्विट केले होते. दरम्यान रेल्वेने आपल्या कोणत्याही संपत्तीचे खासगीकरण केलेले नाही, असे सांगत सरकारच्या अखत्यारितील पीआयबीने हा दावा खोडून काढला आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT