Brazilian Model rahul gandhi haryana vote chori:
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी हायड्रोजन बॉम्ब टाकत हरियाणाच्या निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा दावा केला. त्यांनी आपल्या प्रेझेंटेशन दरम्यान एका ब्राझिलीयन मॉडेलचा उल्लेख केला होता. या मॉडेलनं हरियाणाच्या निवडणुकीत तब्बल २२ वेळा मतदान केल्याचा दावा राहुल गांधीं यांनी केला होता. त्यानंतर आता ब्राझीलच्या या मॉडेलनं व्हिडिओ पोस्ट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेल्या ब्राझिलीयन मॉडेलचे नाव लरिसा आहे. भारतात या महिलेची मोठी चर्चा सुरू आहे. याचं मोठं आश्चर्य या महिलेला वाटलं. त्या महिलेनं व्हिडिओ पोस्ट करून तिचा भारताच्या राजकारणाशी काही संबंध नाही असं सांगितलं. तिनं कोणीतरी तिच्या स्टॉक इमेज खरेदी केली आहे. त्या फोटोचा चुकीचा उपयोग केला आहे असं सांगितलं.
कधीकाळी मॉडेलिंग करणारी लरिसा आता या व्यवसायापासून दूर आहे. मात्र ती इन्स्टाग्रामवर अजूनही सक्रीय आहे. लरिसानं सांगितलं की या घटनेनंतर अनेक भारतीय पत्रकारांचा तिला मॅसेज येत आहे. दरम्यान, लरिसानं ब्राझीलच्या भाषेत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ मेसेज पोस्ट केला. लरिसा आपल्या व्हिडिओ पोस्टमध्ये म्हणते,
'हॅलो इंडिया मला भारतीय पत्रकारांकडून एक व्हिडिओ करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. मला भारताच्या राजकारणाशी काही घेणंदेणं नाही. मी कधी भारतात आले देखील नाही. मी ब्राझिलीयन मॉडेल होते आणि डिजीटल इन्फ्लुएन्सर देखील आहे. मी भारतीय लोकांवर प्रेम करते आपले खूप खूप धन्यवाद नमस्ते.' मला माझं मत मांडायचं आहे. हा पूर्ण प्रकार खूप गंभीर झाला आहे. काही भारतीय पत्रकारांना माझ्याकडून माहिती हवी होती. काही भारतीय पत्रकार मला शोधत आहेत. त्यांना माझी मुलाखत घ्यायची आहे. मित्रांनो मी सर्वांना मुलाखत दिली आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. होय मी ती रहस्यमय ब्राझिलीयन महिला आहे. माझ्या भारतीय मतदारांनो तुमचं माझ्या इन्स्टाग्रामवर स्वागत आहे. चला काही भारतीय फॉलोअर्सशी बोलूयात. ती मी नाहीये तो फक्त माझा फोटो आहे. मी काही गोष्टी साफ करू इच्छिचे... तुम्हाला वाटतं का मी भारतीयांसारखी दिसते. मला वाटतं की मी मॅक्सिकन दिसते. मात्र दयाळू भारतीयांचे मी आभार मानते. ते माझ्या गोष्टी पाहत आहेत. त्या सर्व गोष्टी भारतीय वृत्तपत्रात अनुवादित केल्या जात आहेत. मला तुमची भाषा येत नाही. मात्र तुमचा दयाळूपणाची प्रशंसा करते.
ब्राझिलीयन मॉडेल लरिसाने दुसऱ्या एका व्हिडिओत हा व्हिडिओ मी भारतातील लोकांसाठी तयार केला आहे असं सांगितलं. आता मला काही भारतीय शब्द देखील शिकले पाहिजेत. मला फक्त नमस्ते एवढंच येतं. मी भारतात फेमस होणार आहे. खूप गंभीर गोष्टी झाल्या आता मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी भारतात प्रसिद्ध होणार आहे.
राहुल गांधी यांनी ५ नोव्हेंबरला प्रेस कॉन्फरन्स घेऊन हरियाणाच्या निवडणुकीत २५ लाख बोगस मतदार होते असा दावा केला. त्यानंतर त्यांनी एका ब्राझिलीयन मॉडेलचा फोटो दाखवत तिनं २२ वेळा वेगवेगळ्या नावानं मतदान केल्याचा दावा केला. त्यावेळी राहुल यांनी ही महिला कोन आहे ब्राझीलची एक मॉडेल आहे. मात्र हरियाणामध्ये त्यांनी २२ वेळा मतदान केलं आहे.