Rahul Gandhi pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi: ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात... राहुल गांधीचा गौप्यस्फोट; काय दिला रिप्लाय?

पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना या विषयावर ज्ञानेश कुमार यांनी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे का अशी विचारणा केली.

Anirudha Sankpal

Rahul Gandhi Gyanesh Kumar message: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयावरील मार्चपूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की मला मुख्य निवडणूक आयुक्ती ज्ञानेश कुमार यांचे मेसेज येतात असा दावा केला आहे.

राहुल यांची पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना या विषयावर ज्ञानेश कुमार यांनी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी राहुल गांधी यांनी आश्चर्यकारक उत्तर दिलं. त्यांनी होय असं सांगत त्यांचे मेसेज येतात. ते ही प्रेस कॉन्फरन्स पाहत आहेत. तुम्ही त्यांच्या मेसेजला काय उत्तर दिलं असं पत्रकारांनी विचारलं.

राहुल गांधींचा काय होता रिप्लाय?

त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, 'माफीचा साक्षीदार व्हा. तुम्ही गुन्हा केला आहे. तुम्ही मुख्य आरोपी नाही. तुम्ही चूक केली आहे. खूप सोपं आहे. राजीनामा द्या आणि रस्ता साफ करा. काही अडचण नाही. आम्ही तुम्हाला माफ करण्याच्या बाबतीत देखील विचार करू शकतो. कारण ही देशाची सेवा असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विरोधी इंडिया आघाडीचे नेते मुख्य निडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरूद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी आणि संविधान वाचवण्याची लढाई सुरू ठेवणार आहेत.

दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्थेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी लोकांना राजधानीत पोहचण्यापासून रोखलं जात आहे. त्यांना बसस, ट्रेनमधून खाली उतरवलं जात आहे. राहुल गांधी यांनी दिल्ली पूर्णपणे एका किल्ल्यात रूपांतरित झाली आहे. हजारो पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT