Raja Bhaiya Weapon Puja pudhari
राष्ट्रीय

Raja Bhaiya Weapon Puja: एवढ्याच आहेत असं समजू नका... तब्बल ५०० गन्सचे पूजन करणाऱ्या राजा भैयांच्या वक्तव्य व्हायरल

एका व्यक्तीच्या नावावर एकच लायसन्स फायर आर्म मिळते... मग राजा भैयांकडे ५०० बंदुका कुठून आल्या?

Anirudha Sankpal

Raja Bhaiya Weapon Puja: प्रतापगडमध्ये विजयादशमीला कुंडाचे आमदार आणि जनसत्ता दल लोकतांत्रिकचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया यांनी पारंपरिक शस्त्र पूजन केलं. मात्र त्यांचे हे शस्त्र पूजन चर्चेत आले आहे. बेंती राजभवनमध्ये वैदिक मंत्रोच्चारांसह जवळपास ५०० छोट्या मोठ्या बंदुकांची पूजा करण्यात आली. यावेळी राजा भैया देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी एक अस वक्तव्य केलं की उपस्थित सर्वांनी टाळ्याच वाजवल्या.

राजा भैयांचे शक्तीप्रदर्शन

राजा भैया यांच्यासाठी विजया दशमीचा सोहळा हा फक्त धार्मिक सोहळा नसतो तर वंश परंपरा आणि क्षत्रिय पंरपरेशी जोडला जाणारा सन असतो. त्यांचे शस्त्र पूजन हे संपूर्ण देशात चर्चेचा विषय असतो. गेल्या वर्षी त्यांची पत्नी राणी भावनी सिंह यांनी शस्त्रांबाबत आरोप केला होता. त्यानंतर यंदाच्या दसऱ्याला ते किती शस्त्रांचे प्रदर्शन करतात याची उत्सुकता होती.

विजया दशमीच्या पवित्र दिवशी बेंती राजभवन येथे पारंपरिक पद्धतीने शस्त्र पूजन करण्यात आलं. राजभवनात पुरोहित आणि वैदिक आचार्यांकडून धार्मिक विधी पार पाडण्यात आला. त्यानंतर शस्त्रांना पुष्प अर्पित करण्यात आलं अन् आरती करण्यात आली. या सोहळ्यासाठी जवळपास ५०० पेक्षा जास्त शस्त्रे डिस्प्ले करण्यात आली होती.

एवढेच आहेत असं समजू नका...

शस्त्र पूजनावेळी राजा भैया यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य आता चर्चेचा विषय झाला आहे. त्यांनी एवढेच आहेत असं समजू नका; हत्तीचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात. राजा भैया यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांन टाळ्या पिटल्या. मात्र आता त्यांच्या या वक्तव्याची देशभर चर्चा होत आहे.

गेल्या वर्षी शस्त्रावरूनच वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य जोडून पाहिले जात आहे. राजा भैया राजकारणात आपल्या बेधडक अंदाजासाठी ओळखले जातात. त्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे ज्यावेळी त्यांच्या शस्त्र पूजनाची चर्चा देशभरात सुरू आहे.

गेल्या वर्षी पत्नीने केले होते आरोप

राजा भैया यांचे शस्त्र पूजन गेल्या वर्षी देखील वादाच्या भोवऱ्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या पत्नी राणी भानवी सिंह यांनी शस्त्रांबाबत गंभीर आरोप केला होता. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाबाबत त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय गृह मंत्र्यांना देखील पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी कारवाईची मागणी केली होती.

त्यात आता राजा भैया यांनी शस्त्र पूजन करत राजकीय चर्चांना वाचा फोडली आहे. राजा भैया यांनी गेल्या वर्षी शस्त्र पूजन करण्यात आलेली शस्त्रे त्यांचे कुटुंबीय सुरक्षा रक्षक आणि समर्थकांची आहेत. त्यांच्याकडे याचा वैध परवाना देखील आहे. त्यावेळी त्यांनी त्यांचे समर्थक आणि त्यांच्यामध्ये कौटुंबिक संबंध आहेत असं सांगण्यात आलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT