QS Rankings 2026 India Pudhari
राष्ट्रीय

QS Rankings 2026 India | जगात MIT पुन्हा नंबर 1; पण भारतात कोण 'टॉप'वर? देशातील 54 विद्यापीठांचा जागतिक यादीत समावेश...

QS Rankings 2026 India | QS रँकिंगमध्ये मध्ये भारताचा दबदबा; टॉप-200 मध्ये भारतातील 3 संस्था, नवीन 8 विद्यापीठांची थेट एन्ट्री

Akshay Nirmale

QS Rankings 2026 India IIT Delhi IIT Bombay IIT Madras Top Indian universities 2026

नवी दिल्ली : QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 नुकतीच जाहीर झाली असून यावर्षी भारतासाठी संमिश्र चित्र दिसून आले आहे. एकूण 54 भारतीय विद्यापीठांनी या यादीत स्थान मिळवले आहे – 2014 मधील केवळ 11 विद्यापीठांच्या तुलनेत ही मोठी वाढ मानली जात आहे.

या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून अमेरिका, युनायटेड किंगडम आणि चीननंतर सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारा देश ठरला आहे. मात्र, यातील केवळ तीनच भारतीय विद्यापीठे टॉप 200 मध्ये स्थान मिळवू शकली आहेत.

टॉप 200 मध्ये केवळ 3 भारतीय संस्था

  1. IIT दिल्ली – 123व्या क्रमांकावर असून गेल्या वर्षीच्या 150 व्या स्थानावरून मोठी झेप घेतली आहे. 2024 मध्ये आयआयटी दिल्लीचे स्थान 197 होते. नोकरी संधी (Employer Reputation) मध्ये IIT दिल्ली 50 वा क्रमांकावर असून, संशोधन (Citations per Faculty) मध्ये 86 वा आणि अकॅडमिक रेकग्निशनमध्ये 142 वा क्रमांक मिळाला आहे.

  2. IIT बॉम्बे – 129व्या स्थानावर असून 2025 मध्ये ती 118 व्या स्थानी होती.

  3. IIT मद्रास – यावर्षी सर्वात मोठी झेप घेत 47 स्थानांची सुधारणा करत 180 व्या क्रमांकावर पोहोचले आहे.

नवीन 8 भारतीय विद्यापीठांची एन्ट्री

यावर्षी 8 नवीन भारतीय संस्थांनी QS रँकिंगमध्ये प्रवेश केला असून, कोणत्याही देशापेक्षा ही सर्वाधिक नवीन नोंद आहे. त्यामुळे भारतीय उच्च शिक्षणसंस्था हळूहळू आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दृश्यमान होत आहेत.

भारतातील टॉप 20 शिक्षण संस्था – QS रँकिंग 2026

भारतातील रँक जागतिक रँक संस्थेचे नाव राज्य

1 123 IIT दिल्ली दिल्ली

2 129 IIT बॉम्बे महाराष्ट्र

3 180 IIT मद्रास तामिळनाडू

4 =215 IIT खरगपूर पश्चिम बंगाल

5 =219 IISc बंगलोर कर्नाटक

6 222 IIT कानपूर उत्तर प्रदेश

7 =328 दिल्ली विद्यापीठ दिल्ली

8 =334 IIT गुवाहाटी आसाम

9 =339 IIT रुडकी उत्तराखंड

10 =465 अण्णा विद्यापीठ तामिळनाडू

11 503 शूलिनी युनिव्हर्सिटी सोलन हिमाचल प्रदेश

12 =556 IIT इंदोर मध्य प्रदेश

13 =558 जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) दिल्ली

14 =566 IIT BHU वाराणसी उत्तर प्रदेश

15 =566 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र

16 =575 चंदीगड युनिव्हर्सिटी पंजाब

17 =664 IIT हैदराबाद तेलंगणा

18 =664 मुंबई विद्यापीठ महाराष्ट्र

19 =668 BITS पिलानी राजस्थान

20 =676 जाधवपूर विद्यापीठ पश्चिम बंगाल

जगातील टॉप 10 विद्यापीठे – QS रँकिंग 2026

जागतिक रँक विद्यापीठ देश

1 Massachusetts Institute of Technology (MIT) अमेरिका

2 Imperial College London युनायटेड किंगडम

3 Stanford University अमेरिका

4 University of Oxford युनायटेड किंगडम

5 Harvard University अमेरिका

6 University of Cambridge युनायटेड किंगडम

7 ETH Zurich स्वित्झर्लंड

8 National University of Singapore (NUS) सिंगापूर

9 University College London (UCL) युनायटेड किंगडम

10 California Institute of Technology (Caltech) अमेरिका

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची विविधता पाहणार

या वर्षीच्या रँकिंगमध्ये एक नवा घटक – आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची विविधता (International Student Diversity) – समाविष्ट करण्यात आला आहे. तथापि, यावर गुण दिले गेलेले नाहीत. हे मोजमाप विद्यापीठात किती परदेशी विद्यार्थी आहेत आणि त्यांचे विविधतेचे प्रमाण काय आहे, यावर आधारित आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटर/X वरून याची दखल घेतली असून, भारतातील वाढते प्रतिनिधित्व हा एक सकारात्मक संकेत असल्याचे म्हटले आहे. नव्या शैक्षणिक धोरणांमुळे (NEP 2020) भारतातील विद्यापीठांना अधिक जागतिक दर्जा प्राप्त होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT