Punjabi Influencer Manjeet Kaur File Photo
राष्ट्रीय

Punjabi influencer death: जंगलात झाडाला बांधून जिवंत जाळलं; इन्फ्लुएन्सरची दोन महिन्यांची झुंज संपली, लिव्ह-इन पार्टनरवर आरोप

चंदीगडमधून कथितपणे अपहरण करून, पंजाबमधील मोरिंडाजवळील जंगलात झाडाला बांधून पेटवून देण्यात आलेल्या प्रसिद्ध पंजाबी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर हिचा अखेर मृत्यू झाला.

मोहन कारंडे

Punjabi influencer Manjeet Kaur death

चंदीगड: चंदीगडमधून कथितपणे अपहरण करून, पंजाबमधील मोरिंडाजवळील जंगलात झाडाला बांधून पेटवून देण्यात आलेल्या प्रसिद्ध पंजाबी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर हिचा अखेर मृत्यू झाला. ३ जुलै रोजी ही घटना घडली होती.

गंभीर भाजलेल्या मनजीतवर 'पोस्टग्रेज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च' (PGIMER) रुग्णालयात उपचार सुरू असताना २६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. घटनेच्या तब्बल दोन महिन्यांनंतर मनजीतच्या आईच्या तक्रारीवरून चंदीगड पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

झाडाला बांधून जीवंत पेटवलं

मनजीत कौरची आई कांता देवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ आणि ४ जुलैच्या मध्यरात्री मनजीतच्या दोन ओळखीच्या व्यक्तींनी तिला चंदीगडच्या सेक्टर ३४ मध्ये भेटायला बोलावले. तिथे तिच्यावर हल्ला करून तिला बळजबरीने गाडीत बसवले आणि मोरिंडाच्या जंगलात नेले. तेथे तिला एका झाडाला बांधून पेटवून दिले आणि आरोपी पसार झाले. यानंतर तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीने घटनास्थळी पोहोचून ब्लँकेटच्या साहाय्याने आग विझवली. मनजीतला सुरुवातीला मोरिंडा आणि नंतर मोहालीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी तिला चंदीगडच्या 'पीजीआयएमईआर' रुग्णालयात हलवण्यात आले होते.

रुग्णालयात कित्येक आठवडे मनजीत बेशुद्धावस्थेत होती. ५ ऑगस्ट रोजी तिला थोड्या वेळासाठी शुद्ध आली, तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला हा भयानक प्रकार कुटुंबाला सांगितला. मात्र, वैद्यकीय प्रयत्नांनंतरही तिची प्रकृती खालावत गेली आणि २६ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला.

७ वर्षांचा मुलगा, घटस्फोट आणि लिव्ह-इन...; पोलिसांनी काय सांगितलं?

या घटनेनंतर सेक्टर ३४ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शादी लाल यांनी सांगितले की, मृत मनजीत हिचा घटस्फोट झाला होता, तिच्या पश्चात सात वर्षांचा मुलगा आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मनजीत संशयितांपैकी एकासोबत 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत होती. सध्या पोलीस पथके त्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT