पंजाब पोलिसांनी कारवाई दरम्यान जप्त केलेला मुद्देमाल Pudhari Photo
राष्ट्रीय

Drugs Racket : पंजाब पोलिसांनी पाकिस्तानातून होणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश; 105 किलो हेरॉईन जप्त

तस्करी करणाऱ्या दोन संशयितांना घेतले ताब्यात

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब पोलिसांनी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुप्तचरांच्या नेतृत्वाखालील ऑपरेशनमध्ये, सीमापार तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. यामध्ये ड्रग्ज तस्कर नवप्रीत सिंग आणि नव भुल्लरच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. पंजाब स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेलनी केलेल्या या कारवाईमध्ये 105 किलो हेरॉइन, 31.93 किलो कॅफिन, 17 किलो डीएमआर ड्रग्ज, आणि 5 विदेशी पिस्टल आणि एक गावठी कठ्ठा जप्त केला आहे.

या तस्करी दरम्यान मिळालेल्या माहितीमध्ये पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये पाकिस्तानमधून अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी जलमार्गाचा वापर केला जात होता. यावेळी पंजाब पोलिसांनी टायरच्या मोठ्या रबर ट्यूब देखील जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी नवज्योत सिंग आणि लवप्रीत कुमार यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची एफआयआर अमृतसर येथे नोंदवला गेला आहे. या ड्रग तस्करीमध्ये गुंतलेल्या आणखी गुन्हेगारांना पकडण्यासाठी मागास आणि पुढे संबंध स्थापित करण्यासाठी तपास चालू आहे, अशी महिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT