Punjab government withdraws Harbhajan Singh's security
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
पंजाब सरकारने सुरक्षा काढून घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच केंद्र सरकारने माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंह यांना सीआरपीएफची सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार, हरभजन सिंग यांना दिल्ली आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी केंद्रीय सुरक्षा कवच उपलब्ध होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आम आदमी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या इतर खासदारांनाही हीच सुरक्षा देण्यात आली आहे. यात राघव चढ्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता आणि विक्रमजीत साहनी यांचा समावेश आहे. या नेत्यांवर वाढता धोका आणि पंजाबमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरू असलेली निदर्शने लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी पंजाब राज्य सरकारने हरभजन सिंग यांची झेड प्लस श्रेणीतील सुरक्षा काढून घेतली होती. जालंधर येथील त्यांच्या निवासस्थानावरून सुरक्षा रक्षक आणि सरकारी वाहने परत बोलावण्यात आली होती. या निर्णयानंतर त्यांच्या घराबाहेर निदर्शने झाली असून भिंतीवर ‘गद्दार’ असे लिहिल्याची घटना समोर आली आहे.