H-1B Visa Fee Hike Narendra Modi :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२०) गुजरातमधील भावनगर इथं एका सार्वजनिक कार्यक्रमात लोकांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी भारताचा खरा शत्रू कोण आहे हे देखील सांगितलं. त्यांचं हे वक्तव्य नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B Visa ची वार्षिक फी ही १ लाख डॉलर इतकी वाढवण्याच्या निर्णयाशी जोडून पाहिलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भावनगरच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, 'आपल्या देशाचा जगात मोठा असा कोणता शत्रू नाहीये. फक्त आपला खरा शत्रू हा आपलं दुसऱ्या देशांवरचं अवलंबत्व हे आहे. हा आपल्या देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपण सर्वांनी मिळून या परावलंबत्वाच्या शत्रूला हरवलं पाहिजे.'
मोदी यांनी आपण स्वावलंबी का होण्याची गरज आहे हे सांगितलं. याचबरोबर त्यांनी स्वावलंबत्वाला राष्ट्रीय अभिमानाशी आणि भविष्याशी जोडलं. ते म्हणाले, 'इतर देशांवर जितके जास्त अवलंबत्व; देश अयशस्वी होण्याची शक्यता तितकी जास्त. जागतिक शांतता, स्थैर्य आणि भरभराटीसाठी जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशाला स्वावलंबी व्हावच लागेल.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे वक्तव्य अमेरिकेसोबत सुरू असलेल्या टॅरिफ संघर्षानंतर आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा फी वाढवण्याच्या निर्णयानंतर आलं आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका हा भारतालाच बसण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. ट्रम्प यांचा निर्णय २१ सप्टेंबर पासून लागू होणार आहे.
गुजरातमधून बोलताना नरेंद्र मोदींनी स्वदेशीचा नारा दिला. दुसऱ्या देशावर अवलंबत्व म्हणजे आपला आत्म सन्मानाला ठेच असं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही आमच्या १४० कोटी जनतेचं भविष्य दुसऱ्या कोणत्या देशाच्या दावणीला बांधू शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी भारत त्याच्या विकासासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू शकत नाही किंवा येणाऱ्या पीढीचं भविष्य धोक्यात घालू शकत नाही. ते म्हणाले. 'आपल्या शेकडो दुःखांवर एकच औषध आहे ते म्हणजे स्वावलंबत्व!