PM Bhajan Video: पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेन झींच्या भजन क्लबमध्ये सामील झाले. यावेळी त्यांनी भजनाचा देखील आस्वाद घेतला. सध्या भजन क्लबिंग हा तरूणांमध्ये सुरू झालेला एक मॉर्डन ट्रेंड आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चीवर भजनात वादन केलं. यावेळी त्यांनी टाळ्या वाजवल्या, भजनात रममाण झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे दिवंगत विचारवंत दीन दयाल उपाध्याय यांच्या ११० व्या जयंती निमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित होते. हा कार्यक्रम भाजपच्या मुख्यालयात झाला होता. यावेळी तरूणांनी भजन गायले होते. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून दाद दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरूणांसोबत पहिल्या रांगेत बसले होते. यावेळी त्यांनी डफ वाजवला. हे भजन भगवान राम आणि भगवान श्रीकृष्णाला समर्पित होतं.
जंतर मंतरवर झालेल्या जेन झींच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सर्व नेत्यांनी तरूणाईसोबतचा आपला संवाद वाढवला आहे. नरेंद्र मोदी यांचा इन्स्टाग्रामवरील वावर वाढला असून ते आता सेल्फी व्हिडिओ करून तरूणांशी संवाद साधत आहेत.