PM Narendra Modi Independence Day Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ८० व्या स्वातंत्र्य दिनाला लाल किल्यावरून देशाला संबोधित केलं. त्यांनी आजच्या आपल्या भाषणात देशाची सुरक्षा, मेक इन इंडिया यावर जास्त भर दिला. त्याचबरोबर त्यांनी देशातील तरूणांना आधुनिक जगात स्पर्धात्मक राहण्यासाठी AI कौशल्य ट्रेनिंग देण्याबाबत देखील मोठी घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या भाषणात तरूणांसाठी मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वर्षात १ कोटी युवकांना AI स्किल्स ट्रेनिंग दिले जाणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कोचिंग सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
फ्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की सध्या कोचिंग क्लासेसचे मध्यम वर्गातील कुटुंबांवर मोठं बर्डन आहे. मध्यम वर्गातील पालकांना वाटतं की जर त्यांच्या मुलांना कोचिंग सेंटरला पाठवलं नाही तर ते फेल आहेत. आमचं सरकार या कुटुंबीयांना त्यांचे लाखो आणि करोडो रूपये वाचवण्यासाठी मदत करणार आहे.
मोदी पुढे म्हणाले की, आम्ही जे तरूण स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी फ्री ऑनलाईन कोचिंग क्लासेस आयोजित करणार आहोत. आम्ही त्यासाठी डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर देखील उभारणार आहोत. तिथं उच्च गुणवत्ता असलेले टिचर असणार आहेत.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, येणाऱ्या वर्षात आपण शक्तीची सप्तधारा राबवून देशाला एका वेगळ्या नव्या उंचीवर पोहचवणार आहोत. यात मॅन्युफॅक्चरिंग, कृषी आणि फूड प्रोसेसिंग, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन, गतीशीलता, रक्षा शक्ती, ग्रीन इकॉनॉमी आणि ब्लू इकॉनॉमी, सॉफ्ट पॉवर गोष्टीचा समावेश असणार आहे. असे देखील आपल्या भाषणात सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पूर्वी नक्षलवाद आणि माओवादामुळं अनेक तरूणांचे आयुष्य उद्ध्वस्थ झालं होतं असं सांगिलं. मोदी पुढे म्हणाले की, 'मला आता सांगायला आनंद वाटतो की जिथं आधी गोळी चालत होती तिथं आज विश्वास, विकास आणि प्रयत्नांचा तिरंगा फडकत आहे.'