PM Modi On Ram Mandir Dhwajarohan:
अयोध्येतील राम मंदिरावर आज (दि. २५ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्म ध्वाजाचे रोहण करण्यात आलं. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीनेब पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.
या ध्वजारोहणाच्या कार्याक्रमावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास ५०० वर्षापूर्वीपासूनचा संकल्प पूर्ण झाला. आज संपूर्ण जग हे राममय झालं असल्याचे उद्गार काढले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची स्थापना करण्याचा प्रयत्न करत आहोत असे वक्तव्य देखील केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरावरील ध्वाजारोहणानंतर बोलताना म्हणाले, 'हा धर्मध्वज हा फक्त ध्वज नाही तर हा भारतीय सभ्यतेचा संस्कृतीचा कायकल्प आहे. भगवा रंग, सूर्यवंशाचं प्रतिक, ओम आणि कोविदार वृक्ष ही राम राज्याची प्रतिके आहे. हा ध्वज निश्चय, यश आणि संघर्षाचं प्रतिक आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षाचं प्रतिक आहे. हा ध्वज येणारी हजोरो वर्षे प्रभू रामांच्या मुल्यांची उद्घोषणा करेल. सत्य हाच धर्म आहे. आता कोणताही भेदभाव किंवा वेदना नाही तर शांतता आणि आनंद आहे. आता कोणीही गरीब राहणार नाही, मदतीशिवाय राहणार नाही.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, 'आपल्या धर्मग्रंथात जेवढं महत्व मंदिराला आहे तेवढंच ते त्यावरील ध्वजाला आहे. जे मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकत नाहीत ते ध्वजासमोर नतमस्तक होतात. त्याला देखील तेवढीत किंमत आहे. हा ध्वज दूरूनच रामलल्लाच्या जन्मस्थानाची झलक देईल आणि भगवान श्रीरामाचे आदेश आणि प्रेरणा सर्व मानवतेला युगोयुगोपर्यंत पोहोचवत राहील. या अविस्मरणीय क्षणी मी जगभरातील कोट्यवधी रामभक्तांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.'
'मी आज सर्व भक्तांना वंदन करतो. राम मंदिराच्या उभारणीत ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. राम मंदिराच्या बांधकामात सहभागी असलेल्या प्रत्येक मजूर, कारागीर, नियोजक, वास्तुविशारद आणि कामगारांचे मी अभिनंदन करतो.'
याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्थापना करण्याचा प्रयत्न केला. आपण गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येणं गरजेचं आहे. प्रभू रामचंद्र हे एक व्हॅल्यू सिस्टम आहेत. आपण मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा संकल्प करायला हवा. २०४७ पर्यंत भारताला विकसीत देश होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणालाही रोखू शकत नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,