पंतप्रधान नरेंद्र मोदी.  Pudhari News.
राष्ट्रीय

PM Modi : तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॉर्पोरेट क्षेत्राला थेट सवाल

PM Modi FICCI speech : १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील प्राप्तिकर सवलतीचा उल्लेख करत विचारले तिखट प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

PM Modi FICCI speech : "मी १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करमुक्त केले. पण, तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का? तुम्ही तुमच्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली का?", असे सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १९ नोव्हेंबर) कॉर्पोरेट कंपन्यांना केले.

कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले आहेत का?

नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे आयोजित 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'च्या (FICCI) वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉर्पोरेट क्षेत्राला थेट काही प्रश्न विचारले. १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर मिळालेल्या प्राप्तिकर सवलतीकडे लक्ष वेधत, पंतप्रधानांनी कंपन्यांना विचारले की, "कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले आहेत का किंवा नवीन कर्मचारी भरती केली आहे का?."

"तुमची भूकच अशी आहे की, तुम्हाला कितीही दिले तरी तुमचे समाधान होत नाही"

पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज भारतात १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. मला माहीत आहे तुम्ही टाळ्या वाजवणार नाही. मला याची पूर्ण जाणीव आहे, कारण तुमची भूकच अशी आहे की, तुम्हाला कितीही दिले तरी तुमचे समाधान होत नाही," अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

माझे ऐकू नका, पण किमान गांधीजींचे तरी ऐकायला हवे होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "विचार करा, शंभर वर्षे उलटून गेली आहेत. १९३० मध्ये गांधीजी आपल्यासाठी हा संदेश देऊन गेले होते. आज इतक्या वर्षांनंतर मलाही तीच गोष्ट सांगावी लागत आहे. हे तुमचे यश आहे की अपयश? माझे ऐकू नका, पण किमान गांधीजींचे तरी ऐकायला हवे होते! त्यांनीही जाताना स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारताचाच संदेश दिला होता. आता तुमच्या संस्थेलाही १०० वर्षे पूर्ण झाली आहेत, तरीही परिस्थिती तिथेच आहे. माझा हा संदेशही तुम्ही घराघरांत पोहोचवा," असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

काँग्रेस सरकारच्‍या धोरणांवरही साधला निशाणा

यावेळी पंतप्रधानांनी मागील सरकारांच्या धोरणांवरही निशाणा साधला. पूर्वीच्या सरकारांच्या काळात उद्योग जगताला आलेले अनुभव इतके कटू होते की, त्याचा परिणाम आजही उद्योग क्षेत्र आणि विद्यमान सरकार यांच्यातील संबंधांवर होताना दिसतो, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT