PM Modi Aircraft Landing: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील रणनैतिकदृष्टीकोणातून अत्यंत महत्वाच्या असलेल्या मोरान बायबास इमर्जन्सी लँडिंग फॅसिलीटीवर आपलं an IAF C-130J Super Hercules विमान लँड करून एक मोठा संदेश दिला आहे.
आसाममधील दिब्रुघार बायबासवरील आपत्कालीन लँडिंग फॅसिलिटी ही भारताच्या रणनैतिक इन्फ्रास्ट्रक्चरचा एक महत्वाचा भाग आहे. नॅशनल हायवे १२७ वरील हा ४.२ किलोमीटरचा भाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लँडिंगवेळी वापरण्यात आला. या हायवेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच उद्घाटन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर राफेल आणि सुखोई सू ३० एमकेआई फायटर जेट यांनी देखील या हायवेवर आपली कर्तबगारी दाखवली. त्यांनी हा सामान्य हायवे काही मिनिटातच एका उच्च लष्करी करवायतीमध्ये रूपांतरित केला.
इमर्जन्सी लँडिग फॅसिलिटी अर्थात ELF हा एक पर्याया रनवे असतो. हा थेट हायवेवर तयार करण्यात आलेली एक व्यवस्था असते. याचे डिझाईन हे भारतीय वायू दलाच्या समन्वयानं तयार केलेलं आहे. हायवेचा हा पट्टा विशेष शा पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट (PQC) द्वारे तयार केलेला असतो. हा उच्च पातळीची उष्णता आणि मोठ्या विमानांचे वजन पेलण्यास सक्षम असतो.
या हायवेवर ४० टनाचे फायटर जेट्स हेवी कॉम्बॅट एअरक्राफ्ट उतरू शकतात.
तसेच लष्करी सामानाची दळव वळण करणारे ७४ टन वजनी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट देखील इथं उतरू शकतं.
याचबरोबर वेगवान डिप्लॉयमेंटसाठी वापरण्यात येणारे हेलिकॉप्टर्स देखील याचा वापर करू शकतात.
आसाममधील ही ELF चीनसोबतच्या लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलपासून अवघ्या ३०० किलोमीटर अंतरावर आहे. रणनैतिकदृष्ट्या याचे लोकेशन अत्यंत महत्वाचे असून जवळच्याच चाबुआ आणि तेजपूर एअरबेसला एक चांगला बॅक अप पर्याय म्हणून वापर करता येऊ शकतो.
संघर्षाच्या काळात शत्रू राष्ट्राकडून आपले मुख्य हवाई तळ लक्ष्य केलं जाऊ शकतं. त्यावेळी ही हायवेवरील ELF सुविधा भारतीय हवाई दलाला एका कार्यान्वित राहण्याचा एक पर्याय उपलब्ध करून देते. देशातील हायवेंचा एक लँडिंग ऑप्शन म्हणून वापर करण्यानं भारतानं प्रभावीपणे मोबाईल एअर डिफेन्स ग्रीड नेटवर्क तयार केलं आहे. स्टॅटिक एअरबेसपेक्षा हे ग्रीड शत्रू राष्ट्रांना न्युट्रलाईज करण्यास अत्यंत कठीण जातं. लष्करी उपयोगितेसोबतच हे ELF आपत्कालीन परिस्थितीत मानवी मदतकार्य करण्यासाठी देखील वापरलं जाऊ शकतं.
या फॅसिलिटीमुळं दुर्गम भागाशी कनेट करणं सोपं जातं. या फॅसिलिटीवर अवजड वाहतूक विमाने उतरू शकतात. त्यामुळं आसामच्या वरच्या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं, बाचाव टीम आणि वैद्यकीय मदत थेट पोहचवणं शक्य होतं. मोरान फॅसिलिटी ही बॉर्डर नॅशनल सिक्युरिटी इनिशिएटीव्हचा एक भाग आहे. भारतातील २८ ELF साईटमधील चौथी फॅसिलिटी आहे. सध्याच्या घडीला जवळपास १५ फॅसिलिटी कार्यान्वित झाल्या आहेत. या ग्रीड राजस्थानच्या वाळवंटापासून उत्तर प्रदेशपर्यंत पसरल्या आहेत. आता इशान्येकडील रणनैतिक सीमेपर्यंत याची पोहच निर्माण झाली आहे.