अरुण कुमार याने पाळलेला पोपट घरातून उडून जवळच्या एका विजेच्या खांबावर जाऊन बसला. 
राष्ट्रीय

Tragic News : अडीच लाख रुपयांचा 'प्रेमळ' पोपट ठरला तरुणासाठी 'काळ'; वाचवताना जीव गमावला!

विजेच्या तीव्र धक्क्याने हृदयद्रावक अंत, स्‍टीलच्‍या पाईपचा वापर ठरला जीवघेणा

पुढारी वृत्तसेवा

  • अरुण कुमार यांनी 'मकाऊ' (Macaw) जातीचा पोपट पाळला होता

  • याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे

  • पोपट विजेच्या खांबावर जाऊन बसल्‍यानंतर त्‍याला इजा होवू नये यासाठीची त्‍यांची धडपड जीवघेणी ठरली

Man lost his life while trying to save parrot

बंगळूर : आपल्या लाडक्या पोपटाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्नात ३२ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. ही हृदयद्रावक घटना बंगळूरुमधील गिरीनगर परिसरात घडली असून, अरुण कुमार असे मृताचे नाव आहे. तरुण व्‍यावसायिक अशी त्‍याची ओळख होती.

पोपट विजेच्‍या खांबावर जाऊन बसला

इंडिया टूडेने दिलेल्‍या वृत्तानुसार, अरुण कुमार यांनी 'मकाऊ' (Macaw) जातीचा पोपट पाळला होता. त्‍याची किंमत सुमारे २.५ लाख रुपये होती. तो शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरातून उडून जवळच्या एका विजेच्या खांबावर जाऊन बसला. त्‍याला परत आणण्यासाठी अरुण कुमार यांनी एक स्टीलचा पाईप हातात घेतला. ते कंपाऊंड वॉलवर चढले. पोपटास वाचवण्याच्या प्रयत्नात स्टीलच्या पाईपचा संपर्क थेट जिवंत असलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीशी आला. त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. तातडीने कुमार यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

एक चूक जीवावर बेतली

अरुण कुमार यांनी पाळलेला पोपट घरातून उडून जवळच्या एका विजेच्या खांबावर जाऊन बसला. पोपटास वाचवण्याच्या प्रयत्नासाठी त्‍यांनी स्‍टीलच्‍या पापईला त्‍याला हटविण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यांनी स्टीलच्या पाईपच्या मदतीने पक्ष्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तो पाईप उच्च दाबाच्या वाहिनीला स्पर्शला. हा धक्का प्राणघातक ठरला," असे माहिती स्‍थानिक पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT