Pakistani Woman Shahnaz Begum Visa Cancelled
लखनौ : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात विशेष व्हिसा किंवा इतर कारणांमुळे वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची स्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याचा थेट परिणाम उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातही दिसून येत आहे. सध्या बरेलीमध्ये विविध कारणांमुळे ३४ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. त्यापैकी ३३ नागरिकांकडे लॉन्ग टर्म व्हिसा आहे, तर शहनाज वेगम या विशेष उद्देशासाठी प्रवेश व्हिसावर भारतात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार शहनाज बेगम यांना ४८ तासांव भारत सोडावा लागणार आहे.
शहनाज बेगम या बरेलीच्या बारादरी पोलीस ठाणे क्षेत्रातल्या माळी खेडा भागात आपल्या माहेरी आल्या होत्या. त्या Special Purpose Entry Visa (SPEV) वर भारतात दाखल झाल्या होत्या. मात्र, रामपूरजवळ रेल्वे प्रवासादरम्यान त्यांच्या पर्सची चोरी झाली, ज्यामध्ये पासपोर्ट, व्हिसा, पाकिस्तानी सिम कार्ड आणि रोकड होती. त्यांनी बरेली GRP पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही नोंदवली होती.
बरेली जिल्ह्यात सध्या ३४ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत, पण या निर्णयाचा थेट परिणाम सध्या शहनाज बेगम यांच्यावरच झाला आहे. आता त्यांना भारत सोडून पाकिस्तानमध्ये परतावे लागणार आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, उत्तर प्रदेश पोलीस पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील बरेली, रामपूर, बुलंदशहर आणि वाराणसीसारख्या जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत.
बरेली – ३५
रामपूर – ३०
बुलंदशहर – १८
वाराणसी – १०
हे नागरिक विविध प्रकारच्या व्हिसा काढून भारतात राहत होते. आता त्यांची कागदपत्रे आणि व्हिसाचा कालावधी तपासला जात असून, व्हिसा नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.
पाहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट संदेश दिला असून, सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत आणि त्यांना २७ एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच अटारी-वाघा सीमेवरून वाहतूकही तत्काळ बंद करण्यात आली आहे.