CJP Protest Viral Post Fact Check PUDHARI
राष्ट्रीय

CJP Protest Viral Post Fact Check: पाक अभिनेत्री माहिरा खानने दिला CJP आंदोलनाला पाठिंबा... शोध घेतल्यावर वेगळीच माहिती समोर?

कॉकरोज जनता पार्टीच्या या आंदोलनाला पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने पाठिंबा दिल्याची ही पोस्ट असून ती सध्या व्हायरल होत आहे.

Anirudha Sankpal

CJP Protest Viral Post Fact Check: १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील जंतर मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या आंदोलनाबाबत चर्चा सुरू आहे. त्यातच एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

कॉकरोज जनता पार्टीच्या या आंदोलनाला पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने पाठिंबा दिल्याची ही पोस्ट असून ती सध्या व्हायरल होत आहे. खरंच पाकिस्तानी अभिनेत्रीने भारतातील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे का अशी चर्चा सुरू आहे.

अशी आहे व्हायरल पोस्ट

माहिरा खानच्या नावावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये, 'मी नुकतेच अभिजीत दिपके आणि ध्रुव राठी यांना ऐकलं. ते १० ऑक्टोबर रोजी भाजप सरकारविरूद्ध आंदोलन करत आहेत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. भाजपने पाकिस्तानी कलाकारांना भारतात येण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळं मी या आंदोलनाला येऊ शकत नाह. आशा आहे की या आंदोलनानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा चांगले होतील.

तपासात काय आढळलं?

दरम्यान, ही पोस्ट सोशल मीडियावर अनेकजण शेअर करत आहे. मात्र ही पोस्ट खरी नसून ती एआय जनरेटेड आहे. बूम लाईव्हने याबाबत फॅक्ट चेक केलं असून त्यात त्यांना व्हायरल होत असलेला स्क्रीन शॉट हा ओपन AI टूल्स वापरून तयार करण्यात आला आहे. माहिरा खानने देखील अशा प्रकारची कोणतीही स्टोरी आपल्या सोशल मीडियावरून शेअर केलेली नाही हे बूमच्या पडताळणीत दिसून आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT