Pakistan Ceasefire Violation : हवाई हल्‍ल्‍याने पाक बिथरला, LOC वर शस्‍त्रसंधीचं पुन्हा उल्‍लंघन, १३ नागरिक ठार, ५९ जखमी File Photo
राष्ट्रीय

Pakistan Ceasefire Violation : हवाई हल्‍ल्‍याने पाक बिथरला, LOC वर शस्‍त्रसंधीचं पुन्हा उल्‍लंघन, १३ नागरिक ठार, ५९ जखमी

पाकिस्‍तानकडून सलग १४ व्या दिवशी शस्‍त्रसंधीचं उल्‍लंघन करण्यात आले आहे. याला भारतीय लष्‍करानेही जशास तस उत्तर दिले आहे.

निलेश पोतदार

Pakistan violates ceasefire along LOC again with airstrike

जम्‍मू-काश्मीर : पुढारी ऑनलाईन

भारताने काल ७ मे रोजी पाकिस्‍तानात घुसून एअर स्‍ट्राईक केला. यामध्ये पाकिस्‍तानातील दहशतवादी तळांवर हल्‍ले चढवले. यामध्ये दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्‍ले करून दहशतवादाचे कंबरडे मोडले. भारताच्या या हल्‍ल्‍याने बिथरलेल्‍या पाकिस्‍तानने सलग १४ व्या दिवशी पुन्हा नियंत्रण रेषेवर शस्‍त्रसंधीच उल्‍लंघन केलं. पाकिस्तानच्या गोळीबारात १३ नागरिक ठार झाले आहेत, तर ५९ नागरिक जखमी झाले आहेत.

जम्‍मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्‍ला करून पर्यटनासाठी आलेल्‍या निष्‍पाप लोकांचे बळी घेतले होते. या क्रुर घटनेने भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती. यावर पंतप्रधान मोदी यांनीही दहशतवाद्यांना सोडणार नाही. या क्रुर घटनेबद्दल दहशतवाद्यांना आणि त्‍यांच्या आकांना शिक्षा देणारच अशी प्रतिज्ञा केली होती.

दरम्‍यान पंतप्रधान मोदी यांनी सैन्य दलाच्या तीन्ही दलांच्या प्रमुखांशी बैठक घेतली होती. तसेच भारतीय सैन्याला पाकिस्‍तानातील दहशतवाद्यांवर कारवाईसाठी पूर्ण सूट दिली होती. तसेच सर्वपक्षीय नेत्‍यांची बैठक घेउन पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद्यांवरील संभाव्य कारवाईची माहिती दिली होती.

पाकिस्‍तानातील दहशतवाद्यांनी पहलगाम घटना घडवली होती. त्‍यामुळे भारत सरकारने पाकिस्‍तानसोबतचा व्यापर थांबवून त्‍यांची आर्थिक कोंडी केली. तसेच पाकिस्‍तानसोबतचा सिंधु पाणी वाटप करारही स्‍थगित करून पाकिस्‍तानची पाणीबाणी केली होती. तसेच भारतातील सर्व पाकिस्‍तानी नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले होते. भारतातील पाकिस्‍तानी उच्चायुक्‍तालयातील अधिकाऱ्यांचीही संख्या कमी केली होती. भारताच्या या भूमीकेने पाक चांगलाच घाबरला होता.

दरम्‍यान काल (बुधवार) भारताने मध्यरात्री पाकिस्‍तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर एअर स्‍ट्राईक करून ते उद्धवस्‍त केले. यामुळे बिथरलेल्‍या पाकिस्‍तानने काल रात्री जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागातील नियंत्रण रेषेजवळ शस्त्र संधीच सलग १४ व्या दिवशी उल्‍लंघन केलं. शस्त्र आणि तोफखान्यांचा वापर करून पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून विनाकारण गोळीबार करण्यात आला. याला भारतीय लष्करानेही जशास तस प्रत्युत्तर दिलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT