पाकिस्‍तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ File Photo
राष्ट्रीय

Shehbaz Sharif Admits | होय आमचे एअरबेस ‘ब्राम्‍होस’मुळे उद्‌ध्वस्‍त! पाकिस्‍तानच्या पंतप्रधानांची कबुली

Operation Sindoor | भारताने डागलेल्‍या १५ ब्राम्‍होस क्षेपणास्‍त्रांनी रावळपींडीजवळील अनेक लष्‍करी तळ नष्‍ट

Namdev Gharal

Shehbaz Sharif Admits

नवी दिल्‍लीः भारताच्या ब्राम्‍होस क्षेपणास्‍त्रामुळे आमचा रावळपींडीचा एअरपोर्ट उद्‌ध्वस्‍त झाला असल्‍याची स्‍पष्‍ट कबुली पाकिस्‍तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली आहे. अझरबैजान या देशात एका कार्यक्रमादरम्‍यान त्‍यांनी ही कबुली दिली आहे. तत्‍पूर्वी भारताने राबविलेल्‍या ऑपरेशन सिंदूरचा बदला म्‍हणून आम्‍ही भारतावर हल्‍ला करण्याच्या तयारीत होतो. १० मे रोजी पहाटेच्या प्रार्थनेनंतर लष्‍करप्रमुख असिम मुनीर याच्या नेतृत्‍वाखाली हा हल्‍ला करणार होतो. पण तत्‍पूर्वीच भारताकडून लांब पल्‍ल्‍याच्या सुपरसॉनिक ब्राम्‍होस क्षेपणास्‍त्रे पाकिस्‍तानच्या विविध भागात डागली गेली.

९ व १० तारखेच्या रात्री आम्‍ही भारताला चोख प्रत्‍यूत्तर देणार होतो. पहाटे ४.३० च्या फर्जच्या नमाजनंतर आमचे सैनिक हल्‍ला करण्यासाठी तयार होणार होते. पण भारताने पुन्हा ब्राम्‍होसचा मारा केला. या क्षेपणाास्‍त्र हल्‍ल्‍यात रावळपींडी येथील एअरपोर्ट लक्ष्य करण्यात आले. यामुळे येथील एअरपोर्टचे प्रचंड नुकसान झाले आहे.

दरम्‍यान रावळपींडी येथील नूर खान एअरबेसवर ११ लष्‍करी तळ होते ते भारताच्या लष्‍कराने उद्‌ध्वस्‍त केले. या लष्‍करी तळावरुनच भारताच्या पश्चिमी सिमेवरील अनेक नागरी वस्‍तींवर पाकिस्‍ताने ड्रोन हल्‍ला केला होता. त्‍यामुळे हे तळ ब्राम्‍होसने नष्‍ट कले.

पाकिस्‍तानच्या लष्‍करी विमानांचे नुकसान

रावळपिंडी येथील पकिस्‍तान लष्‍कराच्या मुख्यालयापासून अगदी थोड्या अंतरावर एअरबेसमध्ये लॉकहीड सी -१३० हर्कूलस (Lockheed C-130 Hercules) आणि इल्‍यूझीन आय ७८ रिफ्युलर (Ilyushin Il-78 refuellers) यासारखी लष्‍करी विमाने असतात. उपग्रह प्रतिमांच्या विश्लेषणातून किमान दोन लष्करी वाहतूक वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसून येते. दरम्‍यान नूर खान एअरबेसजवळील रफिक, मुरीद, रहिम, यार खान, सुक्‍कर, आणि चुनियान हे लष्‍करी तळ भारताने उद्‌ध्वस्‍त केले आहेत. तर स्‍कूर्दू, भोलारी, जॅकोबाद हे तळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भारताने १५ ब्राम्‍होस क्षेपणास्‍त्रे डागली

दरम्‍यान सुत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार भारताने जवळपास १५ ब्राम्‍होस क्षेपणास्‍त्रे भारताकडून पाकिस्‍तानवर डागण्यात आली. ही क्षेपणास्‍त्रे उचूकपणे डागण्यासाठी एसयु ३० एमकेआय या लॉन्च यंत्रणेचा वापर करण्यात आला. उपग्रह छायाचित्रांवरुन हे स्‍पष्‍ट झाले आहे. पाकिस्‍तानी चिनी क्षेपणास्‍त्र विरोधी यंत्रणेला चकवा देत आपल्‍या ब्राम्‍होस क्षेपणास्‍त्राने अचूकपणे मारा केला असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. रशियाच्या सहकार्याने बनवलेले ब्राम्‍होस हे क्षेपणास्त्र ३०० किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT