Pahalgam Attack |LoC नंतर आंतरराष्ट्रीय सीमेवरही पाकची कुरापत File Photo
राष्ट्रीय

Pahalgam Attack | LoC नंतर आंतरराष्ट्रीय सीमेवरही पाकची कुरापत, भारतीय सैन्याचेही चोख प्रत्‍युत्तर

जम्मूच्या परागवाल सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांचा गोळीबार...

निलेश पोतदार

pakistan started firing on ib india gave a befitting reply

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताच्या कडक कारवाईच्या भीतीने पाकिस्‍तानची घाबरगुंडी उडाली आहे. अशा परिस्‍थितीत पाकिस्‍तानच्या सैन्याकडून आता आंतरराष्‍ट्रीय सीमेवरही गोळीबार केला जात आहे.

या आधी पाकिस्‍तानी सैन्याने पाच दिवस नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. मंगळवार-बुधवारच्या रात्री पाकिस्‍तानी चौक्‍यांकडून गोळीबार केला जात आहे. मात्र या गोळीबाराला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.

भारत सरकार ॲक्‍शन मोडमध्ये

पाकिस्‍तानी सैन्याने केलेल्‍या युद्धबंदी उल्‍लंघणाने LOC च्या सेक्‍टरमध्ये हालचाली गतीमान झाल्‍या आहेत. भारतीय सैन्याचे या ठिकाणच्या स्‍थितीवर बारीक लक्ष आहे. सीमावर्ती भागात ऑपरेशनल अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रत्यक्षात, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकार ॲक्‍शन मोडमध्ये आहे आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेत आहे. दरम्यान, नियंत्रण रेषेवर तणाव वाढतच चालला आहे.

आता परागवाल सेक्‍टरमध्ये गोळीबार

पाकिस्‍तानकडून गेल्‍या सहा दिवसांपासून युद्धबंदीचे उल्‍लंघन करून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जात आहे. मात्र अजा बुधवार पाकिस्‍तानी सैन्याने जम्‍मूच्या परागवाल सेक्‍टरमध्ये आंतरराष्‍ट्रीय सीमेवर गोळीबार करून स्‍थिती आणखीने बिघडवण्याचा प्रयत्‍न केला आहे.

छोट्या शंस्‍त्रांव्दारे पाकिस्‍तानकडून गोळीबार

२९-३० एप्रिलच्या रात्री पाकिस्‍तानने जम्‍मू आणि काश्मीरच्या नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्‍टरवर नियंत्रण रेषेपलीकडे गोळीबार केला. भारतीय लष्‍कराने अजुनही अर्टिलरी गन किंवा एअर डिफेंस गनचा वापर केलेला नाही, कारण पाकिस्‍तानकडून छोट्या शस्‍त्रांमधून गोळीबार केला जात आहे.

या शिवाय बारामुल्‍ला आणि कुपवाडा जिल्‍ह्यातील नियंत्रण रेषेजवळ परगवाल सेक्‍टरमध्ये आंतरराष्‍ट्रीय सीमेपलिकडेही पाकिस्‍तानी सैन्याच्या चौक्‍यांकडून बिना उकसवता गोळीबार होत असल्‍याची माहिती समोर येत आहे. यावर भारतीय सैन्यानेही प्रत्‍युत्तरादाखल जोरदार गोळीबार केला आहे.

परागवाल सेक्टरमध्ये बीएसएफच्या तैनातीत वाढ

पाकिस्‍तानची परागवाल सेक्‍टरमध्ये सक्रियता ही अधिक दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएफची तैनाती वाढवण्यात आली आहे. तसेच येथील चौक्‍यांना सतर्क करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT