भारताच्या जोरदार हल्‍ल्‍यांमुळे पाकची धुळदान, नुकसान लपवण्यासाठी चॅनेल आणि सोशल मीडियावरचे फोटो, व्हिडिओ केले डिलीट File Photo
राष्ट्रीय

भारताच्या जोरदार हल्‍ल्‍यांमुळे पाकची धुळदान, नुकसान लपवण्यासाठी चॅनेल आणि सोशल मीडियावरचे फोटो, व्हिडिओ केले डिलीट

भारतीय लढाऊ विमानांनी केलेल्‍या हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचे एअरबेस उद्ध्वस्‍त

निलेश पोतदार

pakistan hiding damages caused by indian attack force news channels and social media handles to delete pics and videos

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

भारताने गेल्‍या दोन दिवसांपासून पाकिस्‍तानच्या ड्रोन आणि क्षेपणास्‍त्रांच्या हल्‍ल्‍यांचे उत्तर जशाचतसे दिले आहे. पाकिस्‍तानने १० मे रोजी रात्री भारताची राजधानी दिल्‍लीला आपल्‍या फतेह क्षेपणास्‍त्राने लक्ष्य बनवण्याचा अयशस्‍वी प्रयत्‍न केला. मात्र देशाच्या स्‍वदेशी एअर डिफेंस सिस्‍टीमने पाकच्या मनसुब्‍यांचा चक्‍काचूर केला. फतेह क्षेपणास्‍त्राला हवेतच नष्‍ट करण्यात आले.

अशाच प्रकारे पाकिस्‍तानी एअरफोर्सच्या लढाउ विमानांनी श्रीनगर एअरबेसवर हल्‍ला करण्याचा प्रयत्‍न केला. ज्‍याला भारतीय एअर फोर्सने अयशस्‍वी केले. तसेच उत्तरादाखल केलेल्‍या हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानच्या दोन फायटर जेटला पाडून नष्‍ट केले.

तर तिकडे भारताने पाकिस्‍तानच्या एअर डिफेंस सिस्‍टीमच्या चिंधड्या उडवत एअरबेस क्षेपणास्‍त्र हल्‍ल्‍यात नष्‍ट केले. मात्र पाकिस्‍तानी सैन्य भारताने केलेल्‍या नुकसानीला लपवण्यासाठी रणनिती आखत आहे. पाकिस्‍तानी माध्यमही भारताकडून पाकिस्‍तानच्या झालेल्‍या नुकसानीच्या बातम्‍या कवर करत नाहीये. भारतीय हल्‍ल्‍याची कोणतीही बातमी पाकिस्‍तानी माध्यमातून ब्रॉडकास्‍ट करण्यात येत नाही. पाकिस्‍तानी सैन्याने भारतीय हल्‍ल्‍यात झालेल्‍या नुकसानीची दृष्‍ये दाखवण्यास पूर्णपणे प्रतिबंध लावला आहे.

भारताने शुक्रवारी सलग दुसऱ्या रात्री प्रत्‍युत्तरादाखल केलेल्‍या कारवाईत पाकिस्‍तानने जम्‍मू-काश्मीरपासून ते गुजरातपर्यंत केलेल्‍या २६ ठिकाणांवरील क्षेपणास्‍त्र हल्‍ले परतवून लावले. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, विमानतळे, वायुसेनेची ठिकाणे तसेच अन्य सैन्य प्रतिष्‍ठानांना लक्ष्य करण्याच्या पाकिस्‍तानच्या मनसुबे यशस्‍वीपणे उधळून लावले आहेत. समोर येत असलेल्‍या माहितीनुसार, श्रीनगर आणि त्‍याच्या जवळपासच्या परिसरात भारत आणि पाकिस्‍तानी सैन्यात मोठी लढाई सुरू झाली आहे. त्‍या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने हवाई हल्‍ल्‍याच्या संभावित धोक्‍याशी दोनहात करण्यासाठी जमिनीवरून हवेत मारा करणारी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, भारताने शुक्रवारी चार प्रमुख पाकिस्‍तानी एअरबेसवर यशस्‍वीपणे हल्‍ला चढवला. ज्‍यामुळे सैन्य प्रतिष्‍ठाने आणि संपत्‍तीचे मोठे नुकसान केले आहे. भारताकडून नूर खान एअरबेस आणि पाकिस्‍तानच्या पंजाब प्रांतातील चकवाल येथील मुरीद एअरबेस, शोरकोटमध्ये रफीकी एअरबेस आणि रहीम खान एअरबेसला लक्ष्य करून भारतीय लष्‍कराने यशस्‍वी कामगिरी केली. भारताच्या या हल्‍ल्‍याने या चारही एअरबेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाकिस्‍तानी सैन्याचे प्रवक्‍ते जनरल अहमद शरीफ चौधरीने सांगितले की, भारताने या एअरबेसवर आपल्‍या लढाउ विमानांनी क्षेपणास्‍त्रे डागली.

स्‍थानिक लोकांनी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्‍ट केले आहेत, त्‍यामध्ये भारतीय क्षपणास्‍त्राच्या हल्‍ल्‍यात झालेले नुकसान दिसत आहे. पाकिस्‍तानी सैन्य आता हे व्हिडिओ आणि फोटो डिलिट करत सुटली आहे. पाकिस्‍तानी लष्‍कराला बसलेली चपराक लोकांना कळू नये म्‍हणून पाक सैन्याची धडपड सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT