Pahalgam Terror Attack Update file photo
राष्ट्रीय

Pahalgam Terror Attack Update: सॅटेलाईट फोनमुळे पाकिस्तान तोंडघशी, हल्ला कोणी, कसा घडवला... सुरक्षा दलांनी सगळंच Decode केलं

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ला कोणी घडवून आणला? याची माहिती आता समोर आली आहे

दीपक दि. भांदिगरे

Pahalgam Terror Attack Update

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला कोणी घडवून आणला? याची माहिती आता समोर आली आहे. हा हल्ला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) यांनी मिळून घडवून आला. या हल्ल्याचा कट पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या निर्देशांवरून रचण्यात आला आणि दुसरे तिसरे कोणी नसून केवळ पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच तो घडवून आणल्याचे सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी म्हटले आहे.

सुरक्षा सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला २६/११ च्या मुंबई हल्ल्यासारखाच लष्कर-ए-तैयबा आणि आयएसआयचा संयुक्त कट होता. आयएसआयने पाकिस्तान स्थित एलईटीचा कमांडर साजिद जट्टला पहलगामच्या बैसरनमधील हल्ल्यासाठी केवळ परदेशी दहशतवाद्यांना तैनात करण्याचे विशिष्ट निर्देश दिले होते. या हल्ल्याच्या कट उघड होऊ नये म्हणून कोणत्याही काश्मिरी दहशतवाद्याला या कटात सहभागी करुन घेतले नाही. त्याऐवजी, जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या परदेशी दहशतवाद्यांना हे हत्याकांड घडवून आणण्यास सांगण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.

कोण आहे सुलेमान? ज्याने पहलगाम हल्ला घडवून आणला

पहलगाम हल्ला सुलेमानच्या नेतृत्त्वाखाली घडवून आणण्यात आला. असा संशय आहे की तो पाकिस्तानच्या स्पेशल फोर्सेसचा माजी संशयित कमांडो होता. त्याने २०२२ मध्ये नियंत्रण रेषा ओलांडून (LoC) जम्मू खोऱ्यात एम-४ शस्त्रासह प्रवेश करण्यापूर्वी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एलईटीच्या मुरीदके तळावर प्रशिक्षण घेतले होते. त्याच्यासोबत आणखी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते.

सॅटेलाईट फोन विश्लेषणातून असेही स्पष्ट झाले आहे की १५ एप्रिल रोजी सुलेमानचे लोकेशन त्राल जंगलात होते. यावरून असे दिसून येते की त्याचा ठावठिकाणा हल्ल्याच्या घटनेपूर्वी एक आठवडा आधी बैसरनजवळच होता.

२०२३ मधील हल्ल्यातही सुलेमानचा सहभाग

एप्रिल २०२३ मध्ये पूंछ येथे लष्कराच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्यातही सुलेमानचा सहभाग होता. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. दरम्यान, पहलगाममध्ये २६ नागरिकांची हत्या करणाऱ्या इतर दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख उद्याप उघड झालेली नाही.

पाकिस्तान स्थित दहशतवादी हाशिम मुसा आणि अली भाई यांचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय यापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी व्यक्त केला होता. पण आतापर्यंतच्या तपासात केवळ सुलेमानच हल्लेखोर असल्याचे असल्याचे सिद्ध झाले आहे. स्थानिक काश्मिरी दहशतवादी आदिल हुसेन ठोकेर हा हल्ल्याचा सूत्रधार असल्याची कोणतीही पुष्टी झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT