नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने दिल्लीत कॅण्डल मार्च काढला. या कॅण्डल मार्चमध्ये लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि सर्व प्रमुख नेते सहभागी झाले होते. या मार्चमध्ये सहभाग पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शुक्रवारी राहुल गांधी काश्मीर दौऱ्यावर होते. काश्मीरमधील अनंतनाग येथे त्यांनी जखमींची भेट घेतली आणि विचारपूस केली. सोबतच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचीही भेट घेतली होती आणि तिथल्या युवकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर संध्याकाळी राहुल गांधी दिल्लीत परतले. दिल्लीत परतल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कॅण्डल मार्चमध्ये राहुल गांधींनी सहभाग घेतला.