Pahalgam terror attack Chinese satellite pudhari
राष्ट्रीय

Pahalgam terror attack Chinese satellite: पहलगाम हल्ल्यावेळी चीनी 'सॅटेलाईट'ने ३७ वेळा बदलली कक्षा; पाक-चीन रणनैतिक संबंध?

Pahalgam terror attack Chinese satellite Orbit: बंगळुरूच्या अंतराळ निगराणी कंपनी दिगंतारा यांच्या एका विश्लेषणानुसार पहलगाम हल्ल्याच्या आधी आणि त्याच्या आसपासच्या दिवसात चीनचे अनेक सॅटेलाईटने आपल्या कक्षेत असामान्य स्वरूपाचा बदल केला होता.

Anirudha Sankpal

Pahalgam terror attack Chinese satellite: २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. भारताने याच्या प्रत्युत्तरात ७ मे २०२५ ऑपरेशन सिंदूर सुरू केलं होतं. आता या दहशवादी हल्ल्याबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. यावरून भारतीय सुरक्षा व्यवस्था आणि चीन - पाकिस्तानचे रणनैतिक संबंध याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दिगंताराचे धक्कादायक विश्लेषण

बंगळुरूच्या अंतराळ निगराणी कंपनी दिगंतारा यांच्या एका विश्लेषणानुसार पहलगाम हल्ल्याच्या आधी आणि त्याच्या आसपासच्या दिवसात चीनचे अनेक सॅटेलाईटने आपल्या कक्षेत असामान्य स्वरूपाचा बदल केला होता. या बदलांमुळे जम्मू काश्मीरच्या पहलगाम आणि आसपासच्या संवेदनशील भागावर त्यांचा सर्व्हेलन्स असण्याच्या शक्यतेला बळ मिळालं आहे.

या रिपोर्टनुसार, 'चीनच्या या अंतराळातील हालचालींची वेळी अत्यंत महत्वाची आहे. असं असलं तरी चीनच्या सॅटेलाईटच्या सहाय्याने पहलगाम हल्ल्याची योजना तयार करण्यासाठी दहशतवाद्यांना मदत केल्याचा अजून ठोक असा पुरावा काही मिळालेला नाही. मात्र चीनच्या या हालचाली भारताच्या अंतराळ सुरक्षा आणि गुप्त सर्व्हेलन्सच्या क्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

१३३२ चीनी अंतराळ उपकरणांचे विश्लेषण

दिगंदाताने १५ एप्रिल पासून ३० एप्रिल २०२५ पर्यंतच्या चीनच्या एकूण १३३२ अंतराळ उपकरणांच्या हालचालींचा अभ्यास केला होता. त्यातील सॅटेलाईट आणि इतर अंतराळ वस्तूंचा देखील समावेश आहे. या एनॅलिसिसमध्ये १९० अंतराळ उपकरणे या कालावधीत किमान एकवेळा आपली कक्ष बदलली होती. त्यातील ३७ अशी उपकरणे होती ज्यांची हालचाल तपास केला असता विशेष लक्ष देण्यासारखी होती.

अंतराळातील या हालचालींबाबतची विशेष बाब म्हणजे पहलगाम आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रांवर चीनी सॅटेलाईटचा सर्व्हेलन्स असण्याची शक्यता वाढते. सामान्य परिस्थितीत हे सॅटेलाईट आपल्या ठरलेल्या कक्षेत पृथ्वीची प्रदक्षिणा करत असतात. त्यांची गती उंची आि पृथ्वीच्या वरून जाणारा त्यांचा मार्ग पहिल्यापासून ठरलेला असतो.

ज्या कोणत्या सॅटेलाईटच्या कक्षेत बदल केला जातो त्यावेळी तो एखाद्या खास भागावरून पूर्वीपेक्षा जास्तवेळा जाऊ शकतो. त्यामुळे त्याला या भागाची जास्त छायाचित्रे घेता येतात. हालचालींचा अभ्यास करणे आणि संभाव्य रणनैतिक माहिती गोळा करण्याची अधिक संधी मिळते.

हल्यापूर्वी सहा दिवस आधी Yaogan-35-01A ने बदलली कक्षा

दिगंताराच्या विश्लेषणानुसार सर्वात महत्वाची घटना ही १६ एप्रिल २०२५ रोजी घडली आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ला २२ एप्रिल रोजी झाला होता. म्हणजे या हल्ल्याच्या सहा दिवस आधी चीनच्या Yaogan-35-01A हा उपग्रहाने आपल्या कक्षेत बदल केला होता. या बदलाअंतर्गत या सेटेलाईटची पहलगामच्या वरून जाण्याची फ्रिक्वेंसी जवळपास दुप्पट झाली होती. या सॅटेलाईटला या भागाचे निरीक्षण करण्यासाठी तुलनेने जास्त संधी मिळाली होती.

Yaogan-35-01A हा उपग्रह अधिकृतरित्या पृथ्वीच्या निरीक्षणासंदर्भातील सॅटेलाईट मानला जातो. मात्र जाणकारांनी या उपग्राहाचा वापर सिग्नल इंटेलिजन्स आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्समध्ये वापर केला जाण्याचा देखील दावा केला आहे. हे उपग्रह फक्त जमिनीवरचे फोटो घेण्यापुरते मर्यादित नसतात. यांच्या वापर तांत्रिक क्षमतेच्या आधारावर रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक संकेताबाबतची देखील माहिती गोळा करण्यासाठी केला जाऊ शकतो.

सध्याच्या घडीला तरी या गोष्टींवरून सॅटेलाईटची कक्षा बदलणे आणि कोणत्या दहशतवादी हल्ल्याची योजाना याचा परस्पर संबंध सिद्ध झालेला नाही. मात्र हल्ल्याच्या आधी कोणत्या तरी संवेदनशील भागावर सर्व्हेलन्सची फ्रिक्वेन्सी वाढणे रणनैतिक दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाची बाब मानली जाते.

हल्ल्याच्या दिवशी देखील कक्षा बदलली

दिगंताराच्या रिपोर्टमध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी दोन अजून महत्वाच्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्या दिवशी पहलगाम हल्ला झाला अन् निष्पाप पर्यटकांना टार्गेट करण्यात आळं. त्या दिवशी चीनच्या Yaogan-39-01B आणि Yaogan-39-01C या दोन सॅटेलाईटने देखील आपल्या कक्षेत असाधारण बदल केला होता. पहिल्या सॅटेलाईटने सायंकाळी ५ वाजून १४ मिनिटांनी आणि दुसऱ्या सॅटेलाईटने सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी आपली कक्षा बदलली होती. हे दोन्ही बदल हल्ल्यानंतरचे होते.

या सॅटेलाईटची विशेष बाब म्हणजे हे दक्षिण आशियाच्या मोठ्या भागाचे सर्व्हेलन्स करण्यास सक्षम आहेत. यांच्या सर्व्हेलन्स क्षेत्रात भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि हिंदी महासागरासोबतच चीनच्या आसपासच्या काही भागांचा समावेश आहे. कक्षेत बदल केल्यानंतर सर्व्हेलन्सची कक्षा ही पहलगामपासून श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि जम्मू पर्यंत वाढते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT