Pahalgam Terror Attack | जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता; ४८ ठिकाणी पर्यटकांसाठी बंदी file photo
राष्ट्रीय

Pahalgam Terror Attack | जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्याची शक्यता; ४८ ठिकाणी पर्यटकांसाठी बंदी

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतर जम्मू-काश्मीर सरकारने घेतला निर्णय

मोहन कारंडे

Pahalgam Terror Attack

जम्मू आणि काश्मीर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील ८७ पैकी ४८ स्थळांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात काही स्लीपर सेल सक्रिय झाल्याचे आढळून आले आहे.

धर्म विचारून २६ पर्यटकांना घातल्या गोल्या

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात २६ जणांची मृत्यू झाला. लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला, त्यांची ओळखपत्रे तपासली आणि नंतर हिंदू पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारले. २६ मृतांपैकी बहुतेक पर्यटक आहेत, तर दोन परदेशी आणि दोन स्थानिक नागरिक आहेत.

बंद करण्यात आलेली प्रमुख पर्यटन स्थळे

  • बांदीपोरा जिल्हा - गुरेझ व्हॅली (स्थानिक पर्यटक वगळता बंद)

  • बडगाम जिल्हा - युसमार्ग, तोसामैदान, दूधपाथरी

  • कुलगाम जिल्हा - अहरबल, कौसरनाग

  • कुपवाडा जिल्हा - बंगस व्हॅली, कारीवान देवर, चंडीगाम

  • हंदवाडा जिल्हा - बांगस व्हॅली

  • सोपोर जिल्हा - वुलर तलाव, रामपोरा आणि राजपोरा, चैरहार, मुंडजी-हमाम-मारकुट धबधबा, खांपू, बोस्निया, विझिटॉप

  • अनंतनाग जिल्हा - सूर्य मंदिर, मत्तन, वेरीनाग गार्डन, सिंथन टॉप, मार्गन टॉप, आकड पार्क

  • बारामुल्ला जिल्हा - हब्बा खातून पॉइंट (कावनेर), बाबा ऋषी, रिंगावली, गोगलदरा, बंदरकोट, श्रुंज धबधबा, कमांड पोस्ट, नंब्लान वॉटरफॉल, इको पार्क, खदानियार

  • पुलवामा जिल्हा - संगरवानी

  • श्रीनगर जिल्हा - जामिया मस्जिद, नोहट्टा, बदमवारी, राजौरी कादल (हॉटेल काना), आली कडाल (जेजे फूड रेस्टॉरंट), आयव्हरी हॉटेल, गंडताल (थीड), पदशापाल रिसॉर्ट (फकीर गुजरी), चेरीफ रिसॉर्ट, चेरी ट्रीफ रिसॉर्ट (फकीर गुजरी) (अस्तनमार्ग पॅराग्लायडिंग पॉइंट), फॉरेस्ट हिल कॉटेज, इको व्हिलेज रिसॉर्ट, अस्तनमार्ग व्ह्यू पॉइंट, अस्तानमार्ग पॅराग्लायडिंग स्पॉट, मामनेथ आणि महादेव हिल्स (फकीर गुजरी मार्गे), बौद्ध मठ, हरवानगंथनम, डी फार्म डी. (कायमगाह रिसॉर्ट)

  • गांदरबल जिल्हा - लचपत्री लॅटरल, हँग पार्क, नारनाग

प्रशासनाची पर्यटकांना विनंती

सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरमधील अनेक प्रमुख पर्यटन स्थळे सध्या पर्यटकांसाठी बंद आहेत. सुरक्षा आणि प्रशासकीय कारणांसाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. पर्यटकांना फक्त अशाच ठिकाणी भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे जिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे आणि जी खुली आहेत. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT