Sandhya Mukherjee And Anindya Chatterjee 
राष्ट्रीय

Padma Awards : बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यानंतर बंगालच्या आणखी दोघांनी नाकारला पुरस्कार !

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या सन्मानीय व्यक्तींच्या यादीतील पश्चिम बंगालमधील तिन्ही व्यक्तींनी पद्म पुरस्कार ( Padma Awards ) स्वीकारण्यास नकार दिला आहे. पद्म पुरस्कार जाहीर झाल्या झाल्या काल बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भटाचार्य ( Buddhadeb Bhattacharjee ) यांनी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. आता त्यांच्या पाठोपाठ तेथील आणखी दोन मोठ्या कलाकारांनी त्यांना मिळालेला 'पद्म' पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

एक दोन दशके नाही तर तब्बल आठ दशके गायन क्षेत्राची सेवा करणाऱ्या ९० वर्षांच्या ज्येष्ठ गायिका संध्या मुखोपाध्याय ( Sandhya Mukherjee ) यांना केंद्राने पद्मश्री पुरस्कार ( Padma Awards ) जाहीर केला. पण, संध्या मुखोपाध्याय यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, माझ्या सारख्या ज्येष्ठ व्यक्तीसाठी हा पुरस्कार नाही. हा पुरस्कार एखाद्या माझ्यापेक्षा कमी अनुभवी अथवा नवख्या कलाकरांसाठी हा पुरस्कार आहे. मुखोपाध्याय यांची मुलगी सौमी सेनगुप्ता या म्हणाल्या, जेव्हा दिल्लीतून पुरस्कारासाठी फोन आला होता, तेव्हा माझ्या आईने त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणाली की, या वयात मला हा पुरस्कार देऊ करणे म्हणजे मला हा माझा अपमान केल्यासारखे वाटत आहे.

सेनगुप्ता पुढे म्हणाल्या, की 'पद्मश्री' ( Padma Awards ) पुरस्कार एखाद्या नव्या तसेच कमी अनुभवी कलाकारांना देणे योग्य आहे. ना की ज्येष्ठ गायिका 'गिताश्री' संध्या मुखोपाध्याय यांच्यासारख्या मोठ्या कलाकरांना. असे त्यांच्या कुटुंबाला व त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे.

संध्या मुखोपाध्याय या बंगलाच्या एक मोठ्या प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांना २०११ साली पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'बंग विभूषण' देऊन सन्मानित करण्यात आले होते. शिवाय १९७० मध्ये त्यांना पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

आणखी एक बंगालचे मोठे कलाकार तबलावादक अनिंद्य चटर्जी ( Anindya Chatterjee ) यांना देखील पद्मश्री पुरस्कार घोषित केल्याचा फोन केंद्राने चटर्जी यांना केला. त्यांनीही हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. पंडित रविशंकर, उस्ताद अमजद अली खान आणि उस्ताद अली अकबर खान सारख्या दिग्गजांसोबत पंडित अनिंद्य चटर्जी यांनी काम केले आहे.

२००२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त तबलावादक चटर्जी म्हणाले, मी विनम्रतेने केंद्राचे धन्यवाद मानून हा पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. मी या वयात पद्मश्री सारखा पुरस्कार स्वीकारु शकत नाही, असे पुरस्कार स्वीकार करण्याचे माझे वय निघून गेले आहे.

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राने केली होती. केंद्राने पद्मभूषण पुरस्कार पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना जाहीर केला. तेव्हा त्वरीत भट्टाचार्य यांनी हा सन्मान स्वीकारण्यास नकार दिला. भट्टाचार्य हे डाव्याविचारांचे अग्रणी समजले जातात. कम्युनिस्ट पक्षाचे ते ज्येष्ठ नेत आहेत. भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते कडवे विरोधक समजले जातात.

बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या बरोबर बंगालमधील दोन मोठ्या व ज्येष्ठ कलाकारांनी देखील त्यांना देण्यात आलेला पद्म पुरस्कारचा स्वीकार करण्यास नकार दिला. तशा अर्थाने केंद्राला व नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारला बंगाल कडून मिळालेला मोठा झटका मानला जात आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) या पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) तसेच गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांचा कडवा विरोध करतात. बंगालच्या निवडणुकीत त्यांनी कडवी झुंज देत भाजपला मागे सारत बंगालची सत्ता हस्तगत केली होती. आता सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनीही त्यांनी देऊ केलेल्या पुरस्काराला नकारल्याने मोदी सरकारला दिलेला आणखी एक मोठा झटका समजला जात आहे.

केंद्राच्या कार्यपद्धतीनुसार पहिल्यांदा पुरस्कारप्राप्त विजेत्यांना पुरस्काराबाबत सुचित करण्यात येते. त्या नंतर तो पुरस्कार त्यांनी स्विकार केल्यानंतरच अशा पुरस्कारांची घोषणा केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT