Operation Sindoor - Scalp Missile and Hammer smart bomb Pudhari
राष्ट्रीय

Operation Sindoor: भारताच्या एअरस्ट्राईकमध्ये SCALP आणि HAMMER शस्त्रास्त्र निवड का योग्य ठरली?

Operation Sindoor: राफेल लढाऊ विमानांवरून अचूक घाव; पाकिस्तान हादरला!

Akshay Nirmale

Operation Sindoor why India use Scalp cruise missles and Hammer smart bomb system

नवी दिल्ली : भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेले हवाई हल्ले केवळ अचूक नव्हते तर रणनितीच्या दृष्टिकोनातून अत्यंत परिणामकारक होते.

या मोहिमेत भारताने वापरलेली दोन प्रमुख शस्त्रास्त्रे म्हणजे SCALP क्रूझ क्षेपणास्त्र आणि HAMMER स्मार्ट बॉम्ब प्रणाली. या एअरस्ट्राईकसाठी ही दोन्ही शस्त्रे Rafale लढाऊ विमानांवर बसवण्यात आली होती.

काय आहे ही स्कॅल्प क्षेपणास्त्रे आणि हॅमर स्मार्ट बॉम्ब प्रणाली याविषयी जाणून घेऊया...

SCALP क्रुझ मिसाईल (Storm Shadow)

  • गुप्ततेचे सामर्थ्य, खोलवर मारा

  • 450 किमी पर्यंत रेंज असलेले हे क्षेपणास्त्र रात्री आणि कुठल्याही हवामानात वापरता येते.

  • MBDA (युरोपियन संरक्षण संघ) या कंपनीने तयार केलेले हे क्षेपणास्त्र, INS, GPS आणि Terrain Referencing वापरून अचूक लक्ष्यभेदन करते.

  • हे क्षेपणास्त्र कमीत कमी उंचीवरून उडत असल्यामुळे रडारला सहज सापडत नाही.

  • 450 किलो वजनी वॉरहेड वाहून नेऊ शकते.

  • बंकर, दारुगोळ्याचे गोदामे किंवा मजबूत संरचना नष्ट करण्यासाठी सर्वोत्तम.

  • पाकिस्तानातल्या बहरावलपूर आणि मुरिदकेतील जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तोयबा च्या तळांवर याच क्षेपणास्त्रांनी दूरवरून मारा करण्यात आला.

हॅमर स्मार्ट बॉम्ब प्रणाली

  • HAMMER (Highly Agile Modular Munition Extended Range)

  • स्मार्ट, वेगवान, अचूक

  • 70 किमी पर्यंतच्या रेंजमध्ये टार्गेटवर अचूक मारा करण्याची क्षमता.

  • साध्या Mk80 सिरीज बॉम्बवर बसवले जाणारे हे फ्रेंच बनावटीचे शस्त्र (Safran कंपनी).

  • जॅमिंगपासून सुरक्षित, कमी उंचीवरून लाँच करता येते.

  • कठीण भूभागातही सहज वापरता येते आणि मजबूत संरचना भेदण्यास सक्षम.

  • सर्व हवामानात वापरता येणारे आणि अडथळ्यांना चकवू शकणारे अत्याधुनिक शस्त्र.

हॉवित्झर्स तोफांचा वापर

Loitering Munitions आणि M777 हॉवित्झर्स (Excalibur Shells)- हवेवरून लक्ष्य ओळखून स्वतःहून फटके देणारी Loitering Munitions, तसेच अत्याधुनिक तोफगोळ्यांसह M777 हॉवित्झर्स तोफा वापरण्यात आल्या.

Rafale लढाऊ विमानांचा निर्णायक उपयोग

या हल्ल्यांमध्ये भारताने पहिल्यांदाच Rafale फायटर जेट्सचा वापर केला. 2019 मधील बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये Mirage 2000 वापरली गेली होती.

यावेळी अद्ययावत आणि स्मार्ट शस्त्रसज्ज Rafale विमाने वापरण्यात आली, ज्यामुळे भारताचा दहशतवादी तळांवरील मारा अधिक अचूक, खोलवर आणि निर्णायक ठरला.

ऑपरेशन सिंदूरमधील मुख्य मुद्दे दृष्टिक्षेपात

  • Scalp क्रूझ मिसाईल्सने 450 किमी अंतरावरील टार्गेट्सवर मारा

  • Hammer बॉम्ब प्रणालीने जवळच्या टार्गेट्सवर अचूक घाव

  • Rafale फायटर जेट्सवरून हल्ला

  • जैश व लष्करच्या तळांचा संपूर्ण नाश

  • पहलगाम हल्ल्याचा प्रतिहल्ला म्हणून ही कारवाई

  • नागरी ठिकाणांचे संरक्षण राखत फक्त दहशतवादी तळांवर मारा

  • भारताच्या लष्कर, नौदल व हवाई दलाने संयुक्तरित्या ही मोहिम पार पाडली.

  • ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांच्या बहरावलपूर व मुरिदकेतील मुख्यालयांवर नेमके हल्ले.

  • 25 मिनिटांत पूर्ण मोहिम

  • कोणतीही नागरी हानी नाही

भारतीय सैन्याची कारवाई : काळजीपूर्वक निवडलेले लक्ष्य

Wing Commander व्योमिका सिंग यांनी मीडियाला माहिती देताना सांगितले की, सर्व टार्गेट्स अचूकपणे नष्ट करण्यात आले असून कोणतीही नागरी हानी झालेली नाही. हे हल्ले बुधवारी रात्री 1.05 ते 1.30 या 25 मिनिटांच्या काळात पार पडले.

या कारवाईसाठी विशिष्ट इमारती किंवा इमारतींचे समूहच लक्ष्य करण्यात आले होते. लष्कराने ‘नो कोलॅटरल डॅमेज’ म्हणजेच नागरिक वा अन्य नागरी ठिकाणी कोणतीही हानी होणार नाही याची खबरदारी घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT