Operation Sindoor : १० वाजता सुरक्षा समितीची तर ११ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक Pudhari Photo
राष्ट्रीय

Operation Sindoor : आज सुरक्षा समितीसह केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

भारत आणखी काही महत्त्वाची पावलं उचलण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

Operation Sindoor

नवी दिल्ली : भारत सरकारने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मध्ये 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत एअर स्ट्राईक केला. त्यानंतर राजधानी दिल्लीत अत्यंत महत्त्वाच्या २ बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक होईल आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष असल्याचे समजते.

भारताने पाकवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत आणखी काही महत्त्वाची पावलं उचलण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाकवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर सुरक्षा समितीची ही पहिली बैठक असेल. त्यामुळे या बैठकीत पाकवर केलेल्या एअर स्ट्राइकसह पुढील ॲक्शन प्लॅनच्या संबंधाने काही महत्वाच्या गोष्टी होण्याची शक्यता आहे. कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे.

या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारद्वारे विशेषतः संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या गोष्टींसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. तत्पूर्वी सकाळी १० वाजता संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत पाकवर केलेल्या एअर स्ट्राइक बद्दल सरकारच्या वतीने अधिकृत आणि सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT