India's S-400 system neutralizes Pakistan's drone missile attack
नवी दिल्ली : पाहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर, पाकिस्ताननं भारतातील 15 लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याचा प्रयत्न केला.
मात्र भारताने वेळेत प्रत्युत्तर देत हा हल्ला अपयशी ठरवला आणि लाहोरमधील पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीला निष्क्रिय केले.
मात्र भारताच्या रशियन बनावटीच्या S-400 हवाई संरक्षण प्रणाली आणि इंटिग्रेटेड काउंटर UAS ग्रिड ने सर्व ड्रोन आणि मिसाइल निष्क्रीय केले.
पाकिस्तानने स्वतःच्या निवेदनात कबूल केलं की लाहोरजवळ एक ड्रोन कोसळला आणि इतर 12 ड्रोन गुजरनवाला, चकवाल, बहावलपूर, कराची, चोर, रावळपिंडी आणि अटॉक जवळ नष्ट झाले. यात लाहोरमध्ये 4 जवान जखमी, तर सिंधमधील मियानो भागात एका नागरिकाचा मृत्यू झाला.
लाहोरमध्ये स्फोटांची मालिका, एअर डिफेन्स यंत्रणा उद्ध्वस्त गुरुवारी लाहोरमध्ये जोरदार स्फोट झाले. हे स्फोट वॉल्टन विमानतळाजवळ ऐकू आले.
भारतीय लष्कराने लाहोरमधील HQ-9 हवाई संरक्षण प्रणालीच्या युनिट्सना लक्ष्य केलं, जी चीनच्या मदतीने विकसित करण्यात आली होती. या हल्ल्यामुळे लाहोरमधील पाक लष्कराची हवाई सुरक्षा व्यवस्था कोलमडली, असं सूत्रांनी सांगितलं.
बुधवारी भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या संयुक्त कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले. या कारवाईत 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
IAF ने राफेल विमानांतून 'एअर टू सर्फेस' मिसाइल हल्ले केले, तर लष्कराने 'सर्फेस टू सर्फेस' मिसाइल्स वापरल्या. सरकारने स्पष्ट केलं की, पाकिस्तानी लष्कराच्या संरचनेवर कोणताही हल्ला करण्यात आलेला नाही आणि केवळ दहशतवादी तळांवरच लक्ष केंद्रित करण्यात आलं.
भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी याला "भारताकडून लादलेली युद्धजन्य कृती" म्हटलं आहे. भारताने पुरावे सादर करून दहशतवादी तळांचे व्हिज्युअल दाखवले, मात्र पाकिस्तानने हल्ल्यात महिला आणि मुलांचा बळी गेल्याचा दावा केला.