Indian Navy admiral Dinesh Tripathi  Pudhari photo
राष्ट्रीय

Indian Navy: ऑपरेशन सिंदूर आजही सुरूच, सर्व काही सार्वजनिक करता येत नाही... पाकिस्तानची झोप उडालीये! नौदल प्रमुखांचे मोठे वक्तव्य

यामुळं अरबी समुद्रात काही घडामोडी आजही घडत आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Anirudha Sankpal

Operation Sindoor Indian Navy:

भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यामुळं पाकिस्तानची झोप उडण्याची शक्यता आहे. ॲडमिरल त्रिपाठी यांनी ऑपरेशन सिंदूर आज देखील सुरू आहे. सर्व काही सार्वजनिक करता येत नाही असं वक्तव्य केलं. यामुळं अरबी समुद्रात काही घडामोडी आजही घडत आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे.

मे महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर लाँच केलं. त्यानंतर भारतीय नौदलानं अरबी समुद्रात आपला आयएनएस विक्रांतसह कॅरिअर बॅटल ग्रुप आक्रमक स्थितीत तैनात केला. या स्ट्रॅटजीमुळं पाकिस्तानला आपल्या युद्धनौका बाहेर काढण्याची संधीच मिळाली नाही.

पाकिस्तानचं खूप मोठं नुकसान

पाकिस्तानच्या युद्धनौका या कराची ग्वादर बंदाराच्या आताच अडकून पडल्या. ॲडमिरल तिवारी यांनी आमच्या या आक्रमक पवित्र्यामुळं पाकिस्तानचं खूप मोठं नुकसान झाल्याचं तिवारी यांनी सांगितलं. त्यांनी गेल्या सात महिन्यापासून भारतीय नौदल उत्तर अरबी समुद्रात सातत्यानं हाय टेम्पो ऑपरेशन राबवत आहे असंही सांगितलं.

दरम्यान, मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी सुरक्षा आणि नौदलाच्या क्षमतेचा खास उल्लेख केला होता. याबद्दल ॲडमिरल त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार देखील मानले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवळी आएनएस विक्रांतवर साजरी केली. त्यांनी नौदलाच्या विविध अंगी क्षमतांची जवळून पाहणी केली.

नौदलाची गेल्या वर्षातील कामगिरी

ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी नौदलाचे गेल्या वर्षीचे काही आकडे समोर ठेवले. त्यांनी नौदलाच्या यशाची जंत्रीत सर्वांसमोर ठेवली.

भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका वर्षातील (नेव्ही डे ते नेव्ही डे) प्रमुख कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

  • ५०,००० तास उड्डाण (फ्लाइंग) केले.

  • ५२ समुद्री चाच्यांना (Pirates) पकडले.

  • समुद्रात ५२० लोकांचे जीव वाचवले.

  • समुद्रामध्ये ११,००० जहाज-दिवस (ship-days) घालवले.

  • ४३,३०० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले.

  • समुद्री चाचेगिरी विरोधी मिशनवर (Anti-Piracy Mission) ४० जहाजे पाठवली.

  • वेगवेगळ्या मिशनवर १३८ जहाजे तैनात केली.

  • १३८ युद्धनौकांनी (warships) ७,८०० व्यापारी जहाजांना (merchant vessels) सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यास मदत केली.

  • २००८ पासून आजपर्यंत एडनच्या आखातात (Gulf of Aden) एक जहाज नेहमीच तैनात असते.

  • लाल समुद्रात (Red Sea) हौथी (Houthi) हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ४० मोठी युद्धनौके तैनात केली, ज्यामुळे ५.६ अब्ज डॉलर (Billion) किमतीचा माल सुरक्षितपणे पार पडला.

  • ऑपरेशन सागर बंधू (Operation Sagar Bandhu) अंतर्गत श्रीलंकेला INS विक्रांत आणि INS उदयगिरीने १२ टन, तर INS सुकन्याने १०-१२ टन मदत सामग्री पोहोचवली.

नौदलात समावेश

ॲडमिरल यांनी अभिमानाने सांगितले की, गेल्या वर्षीच्या नौदल दिवसापासून (Navy Day) आतापर्यंत आम्ही १ नवीन पाणबुडी (Submarine) १२ नवीन युद्धनौका (Warships) नौदलात सामील केल्या आहेत. INS उदयगिरी भारतीय नौदलाची १०० वी युद्धनौका (Warship) बनली आहे.

हिंदी महासागरात आम्ही सदैव तयार

दिनेश त्रिपाठी यांनी हिंदी महासागर क्षेत्रात आम्ही आमची सतत ऑपरेशनल तयारी ठेवली आहे. आमचे प्रत्येक जहाज आणि प्रत्येक जवान हा प्रत्येक क्षणी तयार असतो. ऑपरेशन सिंदूर असो वा लाल समुद्रातील हुती दहशतवाद्यांना धडा शिकवणं असो, समुद्री चाच्यांना पकडणे किंवा श्रीलंकेत मदत पोहचवणं. भारतीय नौदल आज जगातील सर्वात सतर्क, शक्तीशाली आणि मानवीय दृष्टीकोणातून सर्वात चांगल्या नौदलांपैकी एक आहे.

पाकिस्तानची झोप का उडाली आहे कारण त्यांना माहिती आहे की आमचा कॅरिअर बॅटल ग्रुप अजूनही अरबी समुद्रात तैनात आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपण्याचं नाव घेत नाहीये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT