Operation Sindoor Anniversary pak Reply: ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर पाकिस्तान लष्कराने देखील भारताची कॉपी करत पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी या पत्रकार परिषदेत भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी इंग्रजीत पत्रकार परिषद का घेतली असं म्हणत हस्यास्पद काऊन्टर केलं.
चौधरी पत्रकार परिषदेत म्हणाले, 'काही वेळापूर्वीच भारतीय लष्कराच्या DGMO आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. सर्वात प्रथम ते इंग्रजीमधून का बोलत होते? ते संपूर्ण जगाला काय झालं ते सांगण्याच्या प्रयत्न करत होते का?'
चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या या पत्रकार परिषदेतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या या तर्काची चेष्टा सुरू केली आहे.
भारतीय लष्कराने ७ मे २०२५ रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. पाकिस्तानने देखील मरका ए हक या त्यांच्या कथित ऑपरेशनची वर्षपूर्ती साजरी केली.
जिओ न्यूजनुसार यावेळी झालेल्या पत्रकार परिषेदत चौधरी, रेअर अॅडमिरल शिफात अली खान आणि एअर वाईस मार्शल तारिक गाझी यांनी सहभाग घेतला होता.
पत्रकार परिषदेवेळी चौधरी यांनी खोटा दावा केला की भारताचे ऑपरेशन सिंदूर हे अनप्रोव्होक्ट होतं. खरं तर ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी २६ भारतीय नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लाँच केलेलं होतं.
यावेळी पाकिस्तानी लष्कराने भारतीय जेट विमाने पाडल्याचा दावा केधील केला. भारताने हा दावा आधीच खोडून काढला आहे.
भारताचे एअर मार्शल ए.के. भारती यांनी सांगितलं की, आम्ही ७ मे रोजी ९ दहशतवादी तळांवर हल्ला करून ती नष्ट केली होती. याचा पुरावा सर्वांनी पाहिला आहे. आम्ही त्यांच्या ११ एअरफिल्डवर हल्ला केला. आम्ही त्यांचे १३ एअरक्राफ्ट नष्ट केले. यातील काही जमिनीवर होती तर काही हवेत नष्ट करण्यात आली आहेत. एक हवाई उपकरण तर ३०० किलोमीटर दूरवरून आम्ही यशस्वीरित्या टार्गेट केलं होतं. भारती यांनी यावेळी भारताचे कोणतेही लष्करी किंवा नागरी इन्फ्रास्ट्रक्चर हीट झालेलं नाही असं देखील स्पष्ट केलं.
दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते तहिक अंद्राबी यांनी आम्ही भारतासोबत चर्चा करण्यात तयार आहोत असं सांगितलं.