Viral News file photo
राष्ट्रीय

Viral News: असलं कसलं प्रेम! शेजारच्या महिलेची अंतर्वस्त्रे चोरायचा तरुण; 'सीसीटीव्ही'मध्ये कैद झाले धक्कादायक कृत्य

प्रेमाची ही विचित्र घटना तुम्ही कधी ऐकली सुद्धा नसेल. एका महिलेची अंतर्वस्त्र चोरल्याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Viral News

उज्जैन: प्रेमात माणूस काहीही करतो, असं म्हणतात पण, एकतर्फी प्रेमाची ही विचित्र घटना तुम्ही कधी ऐकली सुद्धा नसेल. एक तरुण वारंवार एकाच घराबाहेर जायचा आणि दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांमधून केवळ महिलेचे अंतर्वस्त्र चोरून पसार व्हायचा. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या विकृत कृत्याचा पर्दाफाश झाला आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमधील नेमकी काय आहे ही घटना?

उज्जैनच्या ढांचा भवन परिसरातील ही घटना आहे. येथील एक कुटुंब गेल्या काही दिवसांपासून एका विचित्र समस्येचा सामना करत होते. घरातील महिला रोज अंगणात कपडे वाळत घालायची, मात्र दुसऱ्या दिवशी त्यातील अंतर्वस्त्र गायब असायचे. सुरुवातीला कुटुंबाला वाटले की ही कुणीतरी खोडसाळपणा करत आहे, मात्र ही घटना वारंवार घडू लागल्याने त्यांनी घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाला चोर

कुटुंबाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना धक्काच बसला. रात्रीच्या अंधारात एक तरुण हळूच घरापाशी येतो, आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करतो आणि थेट दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांकडे जातो. तो काही वेळ तिथे रेंगाळतो आणि केवळ महिलेचे अंतर्वस्त्र घेऊन पळ काढतो. हे दृश्य पाहून हादरलेल्या कुटुंबाने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

एकतर्फी प्रेमाचं वेड

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास चक्र फिरवली असता, हा तरुण त्याच परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. अंकित (वय २५) असे या आरोपीचे नाव असून तो पीडित कुटुंबाचा शेजारीच निघाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने जे सांगितले ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले. त्याने सांगितले की, शेजारी राहणाऱ्या त्या विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम करायचा. हे प्रेम इतके विकृत झाले की तो तिच्या ओढीने अशा प्रकारचे कृत्य करू लागला.

छातीवर गोंदवलं महिलेचं नाव

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपी अंकितने आपल्या छातीवर त्या विवाहित महिलेच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला होता. ज्या व्यक्तीला हे कुटुंब रोज शेजारी म्हणून पाहत होते, तोच रात्रीच्या वेळी असे अश्लील चाळे करत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT