राष्ट्रीय

विमानात महिला कर्मचाऱ्याची छेड काढणाऱ्या अटक, दिल्‍ली पोलिसांची कारवाई

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महिला विमान कर्मचाऱ्याची (cabin crew) छेड काढणाऱ्यास  दिल्ली पोलिसांनी अखेर अटक केली आहे. अबसार आलम असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव असून तो जामिया नगर भागात राहतो.

स्पाईस जेटच्या ८१३३ क्रमांकाच्या दिल्ली-हैदराबाद विमानात उड्डाणापूर्वी आलम याने महिला विमान कर्मचाऱ्याची (cabin crew) छेड काढली होती. महिला कर्मचाऱ्याच्यावतीने स्पाईसजेटचे सुरक्षा अधिकारी सुशांत श्रीवास्तव यांनी सोमवारी सायंकाळी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करुन घेत पोलिसांनी आलम याला अटक केली.

महिला कर्मचाऱ्याची छेड काढल्यानंतर आलम याला त्याच्या साथीदारासह विमानातून उतरवले होते. त्यानंतर त्याने लेखी माफी मागितली होती. मात्र स्पाईस जेटच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्‍यात दिले. यानंतर त्‍याला अटक करण्‍यात आल्‍याचे दिल्‍ली पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT