Pudhari
राष्ट्रीय

Crime News : बिहारमधील 'जमुई'सारखीच ओडिशातही 'लज्जास्पद' घटना: पर्यटकांच्या जोडप्याला रस्त्यावर त्रास

Jamui similar incident Odisha : व्‍हायरल व्‍हिडिओनंतर पोलिसांनी दोघांना घेतले ताब्‍यात

नंदू लटके

Jamui similar incident Odisha : हारमधील जमुई भागात दोन अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण प्रकरणी संतापाची लाट उसळली असतानाच असतानाच आता ओडिशा राज्‍यातही अशा एका लज्‍जास्‍पद घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. ओडिशामधील ढेंकनाल जिल्ह्यात असलेल्या प्रसिद्ध कपिलास शिवमंदिराकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या एका तरुण जोडप्याला त्रास दिल्याचा आणि त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेत आज (दि. २२) दोन जणांना ताब्यात घेतले.

काय घडलं?

ही घटना ओडिशामधील ढेंकनाल जिल्‍ह्यातील कपिलास टेकड्यांकडे जाणाऱ्या एका निर्जन असलेल्या रस्त्यावर घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही समाजकंटक मोटारसायकलवरून जाणाऱ्या या जोडप्याचा मार्ग अडवताना स्पष्टपणे दिसत आहेत. आरोपींनी त्या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली, तर पीडित तरुणी संपूर्ण प्रकारादरम्यान मदतीसाठी ओरडत राहिली.

पोलिसांकडून गुन्‍हा दाखल

या घटनेला दुजोरा देताना ढेंकनालचे पोलीस अधीक्षक (SP) अभिनव सोनकर यांनी सांगितले की, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओच्या आधारे गोंडिया पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक पोलीस तपासाच्या आधारे चौकशीसाठी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिकदृष्ट्या पुरेसे पुरावे मिळाल्यावर आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

बिहारमधील जमुईमध्येही अशीच घटना घडली होती

विशेष म्हणजे, बिहारमधील जामुई येथे एका अल्पवयीन मुलावर आणि मुलीवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काही दिवसांतच छळवणुकीची ही घटना समोर आली आहे. जामुईचे पोलीस अधीक्षक विश्वजीत दयाल यांनी सांगितले की, तेथील घटना १९ सप्टेंबरच्या संध्याकाळी घडली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. सध्या, या प्रकरणात सामील असलेल्या सर्व आरोपींची ओळख पटवून त्यांना गजाआड करण्यासाठी एसआयटी (SIT) कडून छापे टाकले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT