Gujarat woman rape case file photo
राष्ट्रीय

Rape Case: धक्कादायक! २३ वर्षीय तरुणीवर प्रियकर आणि अनोळखी नराधमाकडून एकाच दिवशी दोनदा लैंगिक अत्याचार; नंतर अमानुष हत्या

Odisha rape case: एका २३ वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने आणि त्यानंतर मदतीचा बहाणा करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला.

पुढारी वृत्तसेवा

Odisha rape case

जगतसिंहपुर: एका २३ वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने आणि त्यानंतर मदतीचा बहाणा करणाऱ्या एका अनोळखी नराधमाने एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केला. एवढ्या क्रूरतेवर न थांबता, नराधमाने तिला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून दिले, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. ओडिशामधील जगतसिंहपुर जिल्ह्यात ही मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून प्रियकरानेच केला घात

२२ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. पीडित तरुणी आपल्या प्रियकरासोबत घर सोडून पळून जाण्याच्या तयारीत होती. प्रियकराने तिला लग्नाचे वचन देऊन एका मंदिरात बोलावले होते. मात्र, मंदिरात नेण्याऐवजी तो तिला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिला बसस्थानकावर सोडून पळून गेला.

प्रियकराने वाऱ्यावर सोडल्यानंतर पीडिता बसस्थानकावर बसची वाट पाहत होती. यावेळी झारखंडचा रहिवासी असलेला एक तरुण तिथे मोटारसायकलवरून आला. या तरुणाने तिला मदतीचे आश्वासन दिले. पीडितेने घरी जाण्याऐवजी त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याने तिला पारादीप शहरात आपल्या भाड्याच्या घरात नेले आणि तिथे तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. अत्याचारानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिला इमारतीच्या छतावरून खाली फेकून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह आढळून आला.

भावाच्या तक्रारीनंतर धक्कादायक वास्तव उघड

तरुणी २२ फेब्रुवारीला घरी न परतल्याने तिच्या भावाने तिरतोल पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. २३ फेब्रुवारीला तिचा मृतदेह मिळाल्यावर सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, संशय बळावल्याने भावाने २५ फेब्रुवारीला पारादीप मॉडेल पोलीस ठाण्यात बलात्कार आणि हत्येची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दोन्ही नराधमांना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT