Odisha SCB Medical College fire file photo
राष्ट्रीय

Odisha SCB Medical College fire: ओडिशातील SCB वैद्यकीय महाविद्यालयात भीषण आग; १० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

ओडिशातील कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये आज (दि. १६) पहाटे भीषण आग लागली.

मोहन कारंडे

Odisha SCB Medical College fire

कटक: ओडिशातील कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये आज (दि. १६) पहाटे भीषण आग लागली. या घटनेत १० रुग्णांचा मृत्यू झाला असून, आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पहाटेच्या सुमारास काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३ च्या सुमारास ट्रॉमा केअर युनिटमध्ये अचानक आग लागली. आगीची भीषणता इतकी होती की, रुग्णांना बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ रुग्णांचा मृत्यू आयसीयूमध्येच झाला, तर ३ रुग्णांनी दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवत असताना प्राण गमावले.

रुग्णालयाचे २३ कर्मचारी धुरामुळे बेशुद्ध

अग्निशमन दल आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे अनेक रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे रुग्णालयाचे २३ कर्मचारी धुरामुळे गुदमरल्याने बेशुद्ध पडले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री माझी यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT