Lucknow Viral Video: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ पुन्हा एकदा धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आली आहे. एका तरुणीचा अश्लील व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती रात्रीच्या वेळी वेगाने धावणाऱ्या कारच्या खिडकीतून बाहेर येऊन कपडे काढत नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
व्हिडिओमध्ये दिसतं की, कार रस्त्यावर वेगाने धावत असताना एक तरुणी खिडकीतून बाहेर येते आणि अश्लील कृत्य करते. गाडीची नंबर प्लेट पाहिल्यावर ती गाझियाबाद RTO मध्ये नोंदणीकृत असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा प्रकार शहीद पथ परिसरातील असून, इथे अशा प्रकारचे रात्रीच्या वेळी होणारे स्टंट आणि अश्लील कृत्ये वाढत चालल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितलं, “हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे सध्या स्पष्ट झालेलं नाही. मात्र, कारचा नंबर दिसत असल्याने त्यावरून मालक आणि व्हिडिओ तयार करणाऱ्यांचा शोध घेत आहोत.” पोलिसांनी पुढे म्हटलं, “या प्रकारातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अशा वर्तनामुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि रस्त्यांवरील सुरक्षेलाही धोका निर्माण होतो.”
ही पहिलीच वेळ नाही, की लखनऊमध्ये रस्त्यांवर अशा अश्लील कृत्यांचे व्हिडिओ समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी गोमतीनगरच्या जी-20 रोडवर काही युवकांनी थार गाडी दोन चाकांवर चालवतानाचा व्हिडिओ तयार केला होता.
त्याच वेळी गाडीत मोठ्या आवाजात डीजे वाजवून युवक नाचत असल्याचंही दिसलं होतं. तसेच IIM रोडवर तीन युवकांनी हातात चाकू घेऊन रील बनवतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. या सर्व प्रकरणांत पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोषींना अटक केली होती.