१३ एप्रिल २०२६ रोजी गौतम बुद्ध नगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कामगारांची हिंसक निदर्शने झाली होती.  Pudhari
राष्ट्रीय

Noida Protest Foreign Funding |धक्‍कादायक..! नोएडा कामगार आंदोलन भडकवण्यासाठी परदेशातून 'फंडिंग'; आरोपीला मिळाले १ कोटी!

Noida labor protest violence foreign funding | डाव्या विचारसरणीच्या संघटनेशी संबंध, पोलिसांचा खळबळजनक खुलासा

पुढारी वृत्तसेवा

Noida labor protest violence foreign funding

नोएडा (गौतम बुद्ध नगर): नोएडा येथे एप्रिल महिन्यात झालेल्या हिंसक कामगार आंदोलन भडकविण्यासाठी विदेशातून आर्थिक रसद पुरवली गेली. आंदोलनाशी संबंधित एका आरोपीच्या वैयक्तिक बँक खात्यात परदेशातून १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली होती, असा खळबळजनक खुलासा गौतम बुद्ध नगर पोलिसांनी केला आहे. आरोपी सत्यम वर्मा याच्या बँक खात्यात ही रक्कम डॉलर्स, पाउंड्स आणि युरो या स्वरूपात प्राप्त झाली होती, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

१३ एप्रिल रोजी झाली होती हिंसक निदर्शने

१३ एप्रिल रोजी गौतम बुद्ध नगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कामगारांची हिंसक निदर्शने झाली होती. विविध क्षेत्रांतील सुमारे ४०,००० ते ४५,००० कामगार आणि मजूर आयुक्तालयाच्या हद्दीतील ८० हून अधिक ठिकाणी जमले. नोएडा सेक्टर ६३ मध्ये आणि 'मदरसन' कंपनीच्या परिसराशेजारी अशा दोन ठिकाणी हिंसक निदर्शने आणि जाळपोळ करण्यात आली होती. रस्ता रोको करत वाहतुकीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्नही झाला.

डॉलर, पाउंड आणि युरोमध्ये मिळाले पैसे

हिंसाचार प्रकरणी गौतम बुद्ध नगर पोलिसांनी सत्यम वर्मा याला अटक केली. गुन्ह्यांच्या तपासादरम्यान, आरोपी सत्यम वर्मा याच्या बँक खात्यात ही रक्कम डॉलर, पाउंड आणि युरोच्या स्वरूपात जमा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे," असे पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे.

NSA अंतर्गत कारवाई

या हिंसाचार प्रकरणी तपास सुरू असताना आरोपी सत्यम वर्माबद्दल अनेक धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. सत्यम वर्मा आणि आकृती नावाच्या अन्य एका आरोपीने या आंदोलनात, जाळपोळीत आणि सार्वजनिक शांतता भंग करण्यात 'महत्त्वाची भूमिका' बजावली होती. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) कारवाई सुरू केली आहे.

डाव्या विचारसरणीच्या संघटनेशी संबंध, मुख्‍य सूत्रधारासही अटक

सत्यम वर्मा आणि हिमांशू ठाकूर यांना १९ एप्रिल रोजी लखनौमधून अटक करण्यात आली होती. हे दोघेही 'बिगुल मजदूर दस्ता' या डाव्या विचारसरणीच्या कामगार हक्क संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत. यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या आदित्य आनंद यालाही अटक केली आहे.

तपास यंत्रणांच्या रडारवर अनेक संस्था

तपासात असे समोर आले आहे की, वर्माने परदेशातून आलेला हा निधी अनेक वेळा त्याच्या इतर वैयक्तिक बँक खात्यांमध्ये वर्ग केला होता. तो अशा काही संस्थांशी संबंधित आहे, ज्या सध्या पोलिसांच्या तीव्र देखरेखीखाली आहेत. या बँक खात्यांमधून झालेल्या व्यवहारांचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT