Nitin Gadkari Ethanol Blending PUDHARI
राष्ट्रीय

Nitin Gadkari: E20 पेट्रोल नको... मग जास्त पैसे द्या! गडकरींनी हितसंबंधांचे आरोप फेटाळले; सामान्यांसाठी इकडं आड तिकडं विहीर

Anirudha Sankpal

Nitin Gadkari Ethanol Blending: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रम हा त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी सुरू केल्याचे आरोप फेटाळून लावले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांनी ते नेहमीच भारतातील प्रदुषण आणि आयात खर्च कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाची पाठराखण केल्याचं सांगितलं.

कुटुंबीयांना फायद्याचा आरोप फेटाळला

गडकरी यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड करण्याचा त्यांच्या कुटुंबीयांना वैयक्तिक फायदा होणार आहे हा आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे असा दावा केला. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी त्यांच्या मुलाच्या उद्योगांमध्ये इथेनॉल हा एक छोटा भाग आहे. याचबरोबर त्याच्या व्यवसायावर जवळपास १ हजार ६०० कोटी रूपयांचे कर्ज आहे. नितीन गडकरींचा त्याच्या व्यवसायाशी किंवा किंमत आणि खरेदी याच्याशी काही संबंध नाहीये.

नितीन गडकरी यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड करण्याच्या उपक्रमाची पाठराखण ते वाजपेयींच्या सरकारमध्ये असल्यापासून करत आहेत. या धोरणाला युपीए सरकारने देखील पाठिंबा दिला होता. तत्कालीन आईल मंत्री मणीशंकर अय्यर यांनी संसदेत याला पाठिंबा दिला होता.

फक्त ऊसापासून नाही तर...

नितीन गडकरी यांनी ते फक्त ऊसापासून इथेनॉल तयार करण्याच्या बाजूने नाहीयेत तर मका, बांबू याच्यापासून देखील तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलला माझा पाठिंबा आहे. मी सर्व पर्यायी इंधनाचा पाठीराखा आहे. यात मिथेनॉल, हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक या सर्व पर्यायांचा समावेश आहे.

गडकरी यांनी सोशल मीडियावर जे काही कॅम्पेन सुरू झालं आहे त्यात काही तथ्य नाही. ते बहुतांश चुकीच्या माहितीवर आधारित आहे. असं असलं तरी नितीन गडकरी यांनी हायवेवर गाडी चालवताना मायलेज कमी मिळू शकतं हे त्यांनी मान्य केलं. मात्र इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोलमुळं गाड्यांचे इंजीन खराब होते हा दावा त्यांनी फेटाळला. त्यांनी मारूती आणि इतर कार उत्पादक कंपन्यांचा दाखला देखील दिला.

मला अन् सरकारला टार्गेट केलं जातंय...

नितीन गडकरी यांनी E20 पेट्रोलबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा दावा केला. त्यांनी याचा वापर त्यांच्याविरूद्ध आणि सरकारविरूद्ध राजकीय अस्त्र म्हणून केला जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी इथेनॉल ब्लेंड पेट्रोलचा पर्यायाची पाठराखण केली. त्यांनी मिथेनॉल, हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक गाड्यांची देखील पाठराखण करत ते भारतातील प्रदुषण कमी करतील असा दावा केला. तसेच भारताची क्रुड ऑईलवरचे अवलंबत्व देखील कमी करेल असं सांगितलं.

त्यांनी E20 विरूद्धचे कॅम्पेन हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सांगत काही लोकं मला आणि सरकारला टार्गेट करत आहेत. ते E20 बाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. की त्याच्यामुळं इंजीन खराब होतं. सर्व E10 कंप्लायन्ट गाड्या या E20 पेट्रोलसाठी फिट आहेत. याबाबत सध्याच्या घडीला तरी या पेट्रोलमुळे इंजीन खराब झाल्याची कोणतीही तक्रार आलेली नाही.

शुद्ध पेट्रोल हवंय जास्त पैसे द्या

नितीन गडकरी यांना ज्यांना E20 पेट्रोलबाबत शंका आहे त्यांना पेट्रोल पंपांवर E10 पेट्रोल मिळण्याची शक्यता आहे का असं विचारण्यात आल्यावर त्यांनी जर आपण पेट्रोलमध्ये E20 यशस्वीरित्या ब्लेंड केलं आहे तर E10 पेट्रोल कसं मिळणार असं उत्तर दिलं. त्यानंतर त्यांनी ज्या लोकांना इथेनॉल ब्लेंड पेट्रोल नको आहे ते १०० टक्के पेट्रोल वापरू शकतात. मात्र त्यांना यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत असं सांगितलं.

म्हणजे जर इथेनॉल ब्लेंड पेट्रोलमुळे दावा केल्या प्रमाणे गाडीतील काही ठराविक पार्ट्स लवकर खराब होत असतील तर तो आर्थिक भुरदंड E20 पेट्रोल वापरणाऱ्यांना सोसावा लागणार आहे. अन् जर हे टाळायचं म्हटलं अन् शंभर टक्के पेट्रोल वापरायचं म्हटलं तरी सामान्यांच्याच खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळं सामान्यांसाठी इकडं आड तिकडं विहीर अशी स्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT