NEET UG Counselling 2025 : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) पुन्हा एकदा नीट-यूजी २०२५ सीट मॅट्रिक्समध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'एनएमसी'ने शुक्रवारी तिसऱ्या फेरीसाठी सरकारी एमबीबीएसच्या १४७ जागांचा समावेश केला आहे. या बदलामुळे देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नवीन एमबीबीएस आणि बीडीएस जागा जोडल्या गेल्या आहेत. नीट यूजी कौन्सिलिंग २०२५: वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) सीट मॅट्रिक्समध्ये नवीन जागा जोडल्यानंतर नीट यूजी कौन्सिलिंग २०२५ राउंड ३ मध्ये निवडी भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. उमेदवारांना आता mcc.nic.in या अधिकृत पोर्टलवर त्यांची पसंती भरण्याची किंवा बदलण्याची परवानगी १८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत आहे, तर निवडी लॉकिंगसाठी विंडो आज दुपारी ४ ते रात्री ११:५५ दरम्यान खुली राहील.
एकूण वाढीव जागांमध्ये एमबीबीएसच्या १४७ नवीन जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या फेरीसाठी पर्याय निवडण्याची (चॉईस लॉकिंग) अंतिम मुदत आज, १८ ऑक्टोबर रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत आहे. इच्छुक विद्यार्थी या वेळेत आपले विकल्प पुन्हा निवडू शकतात. एनएमसीने केलेल्या सुधारणेनुसार, देशभरातील १६ महाविद्यालयांच्या जागा मॅट्रिक्समध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत, ज्यात बिहारमधील दोन महाविद्यालयांचाही समावेश आहे.
देशात एमबीबीएसच्या जागांची एकूण संख्या आता ८१३ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १,२६,७२५ वर पोहोचली आहे. यापूर्वी ८१२ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण १,२६,६०० एमबीबीएस जागा उपलब्ध होत्या. या आठवड्यात जारी करण्यात आलेल्या सुधारित एनएमसी सीट मॅट्रिक्स २०२५ मध्ये एकूण ९,२०० नवीन वैद्यकीय जागा जोडण्यात आल्या आहेत. अंतिम सीट मॅट्रिक्सनुसार, भारतातील एमबीबीएस जागांची संख्या मागील वर्षाच्या १,१७,७५० वरून १,२६,७२५ झाली आहे.या वाढीव जागांसोबतच, काही विद्यमान पदवीधर जागांच्या नूतनीकरणाला (रिन्यूअल) मंजुरी न मिळाल्याने ४५६ जागांची कपात देखील करण्यात आली आहे.
अंदमान आणि निकोबार (११४), आंध्र प्रदेश (७०६५), अरुणाचल प्रदेश (१००), आसाम(१८७५), बिहार(३३९५), चंदीगड(१५०),छत्तीसगढ ( २४५५), दादरा आणि नगर हवेली (१७७), दिल्ली (१४९७),गोवा (२००), गुजरात, (७४२५)हरियाणा २७१०, हिमाचल प्रदेश (९७०), जम्मू आणि काश्मीर(१६७५), झारखंड(१२०५),कर्नाटक(१३६४४), केरळ(५३०४), मध्य प्रदेश (५६७५), महाराष्ट्र (१२६७४), मणिपूर(५२५), मेघालय(२००), मिझोराम (१००), नागालँड (१००), ओडिशा (३०२५), पांडिचेरी (१८७३), राजस्थान (७३३०), सिक्कीम (१५०), तामिळनाडू (१२६५०), तेलंगणा (९३४०), त्रिपुरा (४००), उत्तर प्रदेश (१३२७५), उत्तराखंड (१४५०), पश्चिम बंगाल (६१९९).