NEET Paper Leak Audio Clip Controversy: नीट पेपर फुटीचा विषय देशभरात तापला असतानाच लखनौमधील एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. लखनौ विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील सहाय्यक प्रोफेसर परमजीत सिंह यांना एका व्हायरल ऑडिओ क्लिपवरून अटक झाली आहे. या कथित क्लिपमध्ये प्रोफेसर महिला विद्यार्थिनीला लीक झालेला नीटचा पेपर ऑफर करतो आणि त्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महिला विद्यार्थिनीने या प्रकारामुळं मानसिक ताण आल्याची तक्रार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर हसनगंज पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली.
दरम्यान, आरोपीने आल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. प्रोफेसरने दावा केला आहे की त्याला अंतर्गत राजकारणामुळं या प्रकरणात अडकवण्यात येत आहे. विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. विद्यापीठाने या प्रकरणी झिरो टॉलरन्स धोरण असल्याचं सांगितलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन करत कडक कारवाईची मागणी केली आहे.