Indians Renouncing Citizenship Latest Data: भारतीय नागरिकांमध्ये परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत असले, तरी गेल्या काही वर्षांत परदेशात होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनी अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे आता भारतीय अधिक सावध होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने माहिती दिली की, गेल्या तीन वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या सुमारे 5 टक्क्यांनी कमी झाली आहे.
सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये एकूण 2,06,378 व्यक्तींनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. 2023 मध्ये ही संख्या 2,16,219, तर 2022 मध्ये 2,25,620 होती. म्हणजेच सलग तीन वर्षे ही संख्या घसरताना दिसत आहे.
केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, 2019 ते 2024 या पाच वर्षांत 8,96,843 भारतीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे.
वर्षानुसार नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या:
2022 - 2,25,620
2023 - 2,16,219
2024 - 2,06,378
ही घसरण परदेशात होणाऱ्या रोजगार फसवणुकीमुळे झाली असल्याचे सरकारचे निरीक्षण आहे.
भारत सरकारने परदेशात नोकरीच्या ऑफर देणाऱ्या एका कंपनीला नोटीस पाठवली आहे. ही कंपनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दक्षिण आशियाई देशांमध्ये रोजगाराचे आमिष दाखवत भारतीयांची फसवणूक करत होती. सरकारने सांगितले की, अशा प्रकारच्या फसवणुकीतून 6,700 भारतीयांना वाचवण्यात परराष्ट्र मंत्रालयाला यश आले आहे.
संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री यांनी सांगितले की, फक्त 2024–25 या वर्षातच परदेशात राहणाऱ्या भारतीयांकडून 16,127 तक्रारी आल्या आहेत.
11,195 तक्रारी ‘मदद’ पोर्टलवर
4,932 तक्रारी सीपीग्राम्सवर आल्या आहेत
भारताचे नागरिकत्व सोडण्याचा ट्रेंड नवा नाही. 2011 ते 2019 या कालावधीत तब्बल 11,89,194 भारतीयांनी नागरिकत्वाचा त्याग केला. काही वर्षांची आकडेवारी:
जास्त पगार, चांगल्या संधी, शिक्षण आणि चांगले जीवनमान यामुळे अनेक भारतीय परदेशात स्थायिक होणे पसंत करतात. परंतु, वाढत्या फसवणूक प्रकरणांमुळे लोक आता अधिक जागरूक होत आहेत.