नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाने ठाण्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे कथित अपहरण, वारंवार बलात्कार, जबरदस्तीने गर्भपात प्रकरणाची सुमोटो (स्वतःहून) दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) चौकशी करण्याचे, मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ आणि पोक्सो कायद्यासह संबंधित कायद्यांनुसार कठोर शिक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने पीडीतेला आधार आणि पुनर्वसनाच्या गरजेवरही भर दिला. पोलिसांनी तीन दिवसांत सविस्तर कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देश देखील राष्ट्रीय महिला आयोगाने दिले आहेत.